विशेष प्रतिनिधी
मुंबई Chitra Wagh: पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांवर सातत्याने टीका करणाऱ्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे खडसे कुटुंबाची कोंडी झाली असून, विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे.Chitra Wagh
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करत होते, तर रोहिणी खडसेही विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवताना दिसत होत्या. मात्र, आता प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने त्यांच्यावर टीकेची धनी होण्याची वेळ आली आहे.Chitra Wagh
चित्रा वाघ यांची पोस्ट काय?
ओऽऽऽऽऽ१२मतीच्या मोठ्ठया ताई…
@supriya_sule
तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ
तुमच्या वाजंत्रीताई
महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात
त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा…
महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे…
आणि
हो…..तुमचा नवरा लहान नाही कि त्याला कोणी उचलून आणून रेव्हपार्टीत बसवेल नाही तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल…
राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलयं तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत.
आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची कोण लपवायचे याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे असं की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय
आणि
गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं…
पुण्यात हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा:2 महिला, 3 पुरुषांना अटक; एकनाथ खडसेंचा जावई पार्टीत सहभागी
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे
Chitra Wagh Criticizes Supriya Sule Rohini Khadse Pune Rave Party
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!
- Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
- राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??