• Download App
    chipi airport inaugration union Minister Ramdas Athawale Speech On Shiv Sena BJP Mahayuti

    Chipi Airport : ‘या ठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे अन् नारायण राणे, मला आठवले महायुतीचे गाणे’, रामदास आठवलेंची चारोळी

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. ठाकरे आणि राणेंमधील विसंवाद या कार्यक्रमातही दिसला. दरम्यान, भाषणावेळी रामदास आठवले यांनी केलेल्या कवितेने सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणले. chipi airport inaugration union Minister Ramdas Athawale Speech On Shiv Sena BJP Mahayuti

    भाषणावेळी रामदास आठवले म्हणाले की, ‘याठिकाणी एकत्र आलेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे, मला आठवलेय महायुतीचे गाणे.” चिपी विमानतळाच्या उद्घटनासाठी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले आहेत. नारायण राणे यांनी मला अगोदरच सांगितलंय की, माझे मुख्यमंत्र्यांशी कोणतेही वैर नाही. उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्यासोबत एकत्र काम केले आहे.



    शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती होती तेव्हा मीदेखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केल्याच्या आठवणींना रामदास आठवले यांनी उजाळा दिला. चिपी विमानतळासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले. आपल्या चारोळीद्वारे रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची युती व्हावी, अशी इच्छा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.

    विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी केंद्रीय नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार केला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार केला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे पाहिलं, ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं.

    chipi airport inaugration union Minister Ramdas Athawale Speech On Shiv Sena BJP Mahayuti

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!