विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. पहिल्या दिवशी ते आले नव्हते. त्यामुळे या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी हल्लाबोल केला. Chief Minister is Absent on second day ; Confusion in the Vidhan Bhavan
हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे अनुपस्थित राहिले. त्यामुळे या मुद्यावरून जोरदार टीका केली. खरे तर नागपूर येथे अधिवेशन घेण्याची तयारी होती. पण, मुख्यमंत्री यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार केवळ पाच दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णयही सरकारने घेतला. कोरोना नियंत्रणात आला असताना अधिवेशनाचा कालावधी सरकारने कमी केला आहे.
कारण सरकार विरोधकांना सामोरे जाऊ शकत नसल्याने हा कालावधी कमी केल्याचा आरोप केला. दुसरीकडे मुंबईत अधिवेशन घेऊनही मुख्यमंत्री अधिवेशनासाठी आले नाहीत. मात्र अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी विधिमंडळाला भेट देऊन पाहणी मात्र केली होती. त्यांना रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी रस्ता ही गुळगुळीत करण्यात आला. मात्र, एवढे करूनही ते अधिवेशनाला उपस्थित राहिले नसल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी पदाचा चार्ज अन्य कोणाकडे का दिला नाही? असा सवालही केला होता.
Chief Minister is Absent on second day ; Confusion in the Vidhan Bhavan
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियांका गांधींच्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालेली नाहीत; प्राथमिक चौकशीतला निष्कर्ष
- यवतमाळमधील ढोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण ; पंतप्रधान मोदींकडून नवदाम्पत्याला मिळाले शुभाशीर्वाद
- पिंपरी चिंचवड : तळेगावमध्ये अकरावीत शिकणाऱ्या मुलाची गोळी झाडून हत्या
- नाशिकच्या रावण घोड्याची मोठी चर्चा; सारंगखेडा येथील अश्व यात्रेत कुतूहल