• Download App
    मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप|Chief Minister does not come to the ministry, Deputy Chief Minister behaves as if he is only from Pune, alleges Chandrasekhar Bavankule

    मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    वाशिम :मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. उपमुख्यमंत्री केवळ पुण्याचेच असल्यासारखे वागतात. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री केवळ आपल्या मतदार संघापुरते मयार्दीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार कुचकामी असल्याची टिका भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Chief Minister does not come to the ministry, Deputy Chief Minister behaves as if he is only from Pune, alleges Chandrasekhar Bavankule

    भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम विदभार्तील युवा वॉरियर्सच्या कार्यक्रमाची सुरुवात सिंदखेड राजा येथुन करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेचा आपल्यालाही आनंद झाला होता,



    परंतु पुढील काही महिने वाट पाहिल्यानंतरदेखील वीज बिलाची ही माफी झाली नाही. यावर विचारले असता वीज मंत्री उपमुख्यमंत्री निर्णयावर सह्या करीत नसल्याची दर्पोक्ती राऊत यांनी केली होती. मुळात शेतकºयांना नागरिकांना 100 युनिट वीज माफी मिळायला पाहिजे होती.

    ओबीसी किंवा मराठा आरक्षण या सरकारला घ्यायचेच नाही. केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मोठे काम केले आहे असे सांगून बावनकुळे म्हणाले, मात्र या सरकारला नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची गरज वाटत नाही, असे सांगून नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची मागणी त्यांनी केली.

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र या सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण टिकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एक नंबरवर आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ग्रामीण भागात विचारा किंवा व्यावसायिकांना विचारा राज्याचे मुख्यमंत्री कोणत्याच नंबरला असणार नाहीत.

    Chief Minister does not come to the ministry, Deputy Chief Minister behaves as if he is only from Pune, alleges Chandrasekhar Bavankule

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!