• Download App
    Chandrashekhar Bawankule OBC Subcommittee Chairman, No One's Share Will Be Given Awayओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंवर;

    Chandrashekhar Bawankule : ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंवर; म्हणाले- कुणाच्याही ताटातील दुसऱ्याच्या ताटात जाणार नाही

    Chandrashekhar Bawankule

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chandrashekhar Bawankule मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर, ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा शेतकऱ्यांना कुणबी, म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाजाने तीव्र विरोध दर्शवला असून, जीआरची होळी करत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.Chandrashekhar Bawankule

    या पार्श्वभूमीवर, ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, आणि संजय राठोड यांचाही समावेश आहे. समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.Chandrashekhar Bawankule



    चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ओबीसी समाजासाठी काल मंत्रिमंडळ उपसमिती जाहीर केली, त्यात भुजबळ, पंकजा मुंडे असे सर्व नेते आहेत. मोदीजींनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा केंद्रात दिला आहे. ओबीसींच्या योजना कार्यान्वित आहेत का, निधी आहे का? याची देखरेख करण्याची या समितीची जबाबदारी आहे. ओबीसी समाज आहे, त्यात काहींना प्रमाणपत्र मिळत नाही, जात पडताळणी होत नाही, अशा घटकांसाठी काम करायचे आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसने आतापर्यंत तोंडाच्या वाफा फेकल्या आहेत, जातिनिहाय जनगणना केली नाही. आता ओबीसीमध्ये 353 जाती आहेत, 18 पगड जातीमधील ओबीसींची जनगणना आहे, त्यात सरकारची काय मदत लागेल हे समिती पाहिल. त्यासोबत आमची भूमिका आहे, मराठा व ओबीसी या दोन्हींची भूमिका आहे. कुणाच्याही ताटातील कुणाच्या ताटात जाणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

    आता दोन समाजाला समोरासमोर न येता, दोन्हींचे हक्क न डावलता न्याय देण्याचे काम करायचे आहे. कुणाचे हक्क कुणाला जाणार नाहीत, परवाच्या जीआरमध्ये स्पष्ट आहे. ज्या नोंदणी आहेत, त्या दुर्लक्षित राहिल्या, त्यामुळे दाखले देत नव्हते. या जीआर मुळे ज्या नोंदणी गॅझेटमध्ये आहेत, त्या तपासून नोंदणीप्रमाणे ओबीसी प्रमाण पत्र मिळणार आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. आताच्या आंदोलकांची मागणी हीच होती, ज्या नोंदणी आहेत त्यांना प्रमाणपत्र द्या. वडिलांची नोंद असेल तर मुलाच्या नोंदीची गरज नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

    संजय राऊतांना टोला

    मराठा आरक्षण आंदोलनास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रसद पुरवली का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, आता राजकीय बोलायचे असेल तर, संजय राऊत यांनी कितीही आमच्या महायुतीत तोंड खुपसले तरी महायुती भक्कम आहे. ते कपड्यावर डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थिर राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. जी जी मदत लागते आहे, त्यासाठी एकनाथ शिंदे हे पाठिशी भक्कम उभे आहेत. ज्यांनी 2019 मध्ये फडणवीसांना धोका दिला, त्यांनी आमचा विचार करू नये, असे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

    Chandrashekhar Bawankule OBC Subcommittee Chairman, No One’s Share Will Be Given Away

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    OBC Mahasangh : ओबीसी महासंघाचे नागपूरमधील उपोषण मागे; 14 पैकी 12 मागण्या सरकारकडून मान्य, एका महिन्यात जीआर काढणार

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकरांचा दावा- भाजपने जरांगेंना गंडवले; जरांगेच नव्हे तर उपसमिती, शिंदे समिती, मराठे, कुणबी सर्वांचीच फसवणूक

    Manoj Jarange : कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच- मनोज जरांगे यांचा निर्धार, सातारा गॅझेटिअरवरून सरकारला इशारा