• Download App
    Chandrashekhar Bawankule, Congress 2047 Prediction Vision Mahayuti Votes Photos Videos Speech चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही,

    Chandrashekhar Bawankule, : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- 2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

    Chandrashekhar Bawankule

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Chandrashekhar Bawankule, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली.Chandrashekhar Bawankule,

    आपल्या भाषणात बावनकुळे यांनी असा दावा केला की, 2047 पर्यंतही काँग्रेसला केंद्रात किंवा राज्यात सत्ता मिळणार नाही. कारण काँग्रेसकडे विकासाबाबत स्पष्ट योजना नाही आणि जनतेकडून मिळणारा प्रतिसादही खूप कमी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- महायुतीला मिळवून दिलेला पाठिंबा याचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीला 3 कोटी 18 लाख मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 2 कोटी 18 लाख मतांवर समाधान मानावे लागले. पुढील 2029 मध्येही महायुतीच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.Chandrashekhar Bawankule,



    यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत भांडणांवरही त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये कुणाचा पाय कुणाच्या पायात बसत नाही, अशी टीका करत त्यांनी अनेक नेत्यांची उदाहरणे दिली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी असून निर्णयप्रक्रियेत समन्वयाचा पूर्ण अभाव आहे, असे ते म्हणाले. या विसंवादामुळेच काँग्रेस कमजोर होत चालली आहे आणि भविष्यात ही पार्टी किंचित पार्टी म्हणूनच ओळखली जाईल, असा दावा त्यांनी केला.

    विकासकामांच्या जोरावर लोकांचा विश्वास भाजपवर

    भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसमध्ये रोज भांडणं, गटबाजी आणि फूट दिसते. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होऊन पक्ष सोडत आहेत. तर दुसरीकडे महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. विकासकामांच्या जोरावर लोकांचा विश्वास भाजपवर वाढत असून येत्या काळात हा विश्वास अजून दृढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप महायुती सरकार आगामी काळात अनेक मोठी प्रकल्प, उद्योग आणि सुविधा राज्यात आणणार आहे. त्यामुळे 2029 पर्यंत काँग्रेसचं अस्तित्व आणखी लहान होईल, असेही ते म्हणाले.

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव

    बवानकुळे यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक वातावरणात नवी चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव अजून वाढण्याची शक्यता असून आगामी काही दिवसांमध्ये वातावरण आणखी तापेल यात शंका नाही. बावनकुळे यांनी केलेल्या विधानांची पुढील राजकीय प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Chandrashekhar  Bawankule Congress 2047 Prediction Vision Mahayuti Votes Photos Videos Speech

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

    बारामतीत अजितदादांनी आठ नगरसेवक बिनविरोध आणले निवडून; शरद पवारांचे 4 उमेदवार 20 – 20 लाख रुपये देऊन फोडले; युगेंद्र पवारांचा आरोप!!

    शरद पवारांची लवकरच दिल्ली वारी, काँग्रेसच्या दरबारी करणार मनसेची वकिली!!