• Download App
    काही जण सुपात तर काही जात्यात : चंद्रकांत पाटील ; ठाकरे - पवार सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा Chandrakant Patil Thackeray - Targeting ministers in Pawar government

    काही जण सुपात तर काही जात्यात : चंद्रकांत पाटील ; ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा

    वृत्तसंस्था

    पुणे : ”काही जण सुपात असून काही जण जात्यात आहेत,” असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारमधील मंत्र्यांवर साधला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील मालमत्तांवर सीबीआयने आज छापेमारी केली. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी येथे प्रतिक्रिया व्यक्त केली. Chandrakant Patil Thackeray – Targeting ministers in Pawar government

    “काही काळजी करु नका, परमेश्वर सर्वांचा हिसाब किताब पूर्ण करतो..” अशा शब्दात मार्मिक टिपण्णी देखील त्यांनी केली.  पाटील म्हणाले, अनिल देशमुखांच्या घरावरील सीबीआयचा छापा ही कायदेशीर बाब आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे.



    तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांवरुन अनिल देखमुखांविरोधात सीबीआय चौकशी सुरु आहे. सचिन वाझेने ऑन पेपर अनिल परब यांच्यावरही आरोप केले आहेत. अनिल परब यांनी देखील मुंबई महापालिकेच्या नावाचा वापर करून अनेकांना धमकाऊन पैसे घेतल्याचे वाझेने सांगितले आहे. त्यांचीही चौकशी झालीच पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

    नेमके काय आहे प्रकरण… 

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून त्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिले होते, असा आरोप केला होता. या प्रकरणी सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सीबीआयने नंतर अनिल देशमुख व संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आज मालमत्तांवर छापे टाकल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विशेषतः ठाकरे – पवार सरकारमधील दोषी हादरले आहेत.

    Chandrakant Patil Thackeray – Targeting ministers in Pawar government

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस