• Download App
    नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळ विस्तार : स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सागितली वेळ|Chances of cabinet expansion during Navratri: Chief Minister Shinde told the time in the lunch program

    नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळ विस्तार : स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सागितली वेळ

    प्रतिनिधी

    मुंबई : पितृपक्ष संपल्यावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला 26 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असा मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी इच्छुकांना सांगितला. विस्ताराला आणखी वेळ असल्याने त्या दृष्टीने तुमची मानसिकता बनवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.Chances of cabinet expansion during Navratri: Chief Minister Shinde told the time in the lunch program

    गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांनी भाजप, शिंदे गट, अपक्ष आमदार तसेच काही उद्योजक, कलावंतांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केले होते. त्यात नेमके काय घडले याची माहिती देताना विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, शिंदे यांनी मंत्री होण्यास इच्छुक असणाऱ्या सर्वांची तीन ते चार वेगवेगळे गट करून बैठक घेतली.



    स्नेहभोजनापूर्वी आणि नंतर अशा दोन सत्रांत अनौपचारिक गप्पांच्या रूपातच ही बैठक झाली. आधी त्यांनी आतापर्यंत मतदारसंघात काय वातावरण आहे, याची माहिती काही जणांकडून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, महिनाभरापासून चर्चेत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची पूर्ण तयारी झाली आहे. त्यात कोणतेही अडथळे राहिलेले नाहीत. एक-दोन मुद्दे बाकी आहेत. पण त्यावर लवकरच चर्चेतून मार्ग निघेल, असे स्पष्ट केले.

    दहा सप्टेंबर रोजी दुपारी पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासारखी मोठी राजकीय हालचाल लगेच करणे शक्य नाही. पितृपक्ष संपल्यावर नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी २६ किंवा फार तर २७ सप्टेंबरला तुमच्यापैकी योग्य लोकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

    मंत्रिपदासाठी कोण-कोण उत्सुक?

    संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, संभाजी पाटील निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, बबनराव लोणीकर, बबनराव पाचपुते, राणा जगजितसिंह आदींसह किमान 50 जण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत.

    Chances of cabinet expansion during Navratri: Chief Minister Shinde told the time in the lunch program

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस