प्रतिनिधी
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज गुरुवारी, १९ ऑगस्ट २०२१ या दिवशी मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.Central Minister Narayan Rane visits Swatantryaveer Savarkar National Memorial in Mumbai
केंद्रीय मंत्रिमंडळात ४२ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्र्यांचा जनसामान्यांशी संपर्क वाढावा, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाला.
या यात्रेची सुरुवात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, पुढे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देत त्यांनी वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्मारकात आल्यानंतर प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला नमन केले. त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, कार्यकारिणी सदस्य मुकुंद गोडबोले उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या प्रसंगी स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आणि वीर सावरकरांचे ग्रंथ भेट देण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.
Central Minister Narayan Rane visits Swatantryaveer Savarkar National Memorial in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- PF Fraud : मुंबईत पीएफच्या नावावर एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक, पोलिसांकडून गुन्हा दाखल
- वादग्रस्त : शायर मुनव्वर राणा पुन्हा बरळले, म्हणाले- भारतात तालिबानपेक्षा जास्त क्रौर्य, त्यांना काय घाबरायचं!
- गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये भररस्त्यात हमरीतुमरी, हाणामारीचे फोटो व्हायरल
- जल जीवन मिशन : एन्सेफलायटीस हॉट स्पॉटमधील १ कोटी घरांना नळाद्वारे पाणी पुरवठा, ५ राज्यांतील ६१ जिल्ह्यांत दिलासादायक चित्र
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप