• Download App
    केंद्र सरकारकडून मोफत धान्याची घोषणा, छगन भुजबळांनी मानले शरद पवारांचे आभार । Central government announces free Rations For poor, Chhagan Bhujbal thanked Sharad Pawar

    केंद्र सरकारकडून मोफत धान्याची घोषणा, छगन भुजबळांनी मानले शरद पवारांचे आभार

    Chhagan Bhujbal : देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येने घाम फोडला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी विविध निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊन लादण्यात आले आहे. गतवर्षी जेव्हा लॉकडाऊन लागले होते, तेव्हा केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी मोफत धान्य वाटपाची तरतूद केली होती. आता पुन्हा एकदा केंद्राने मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमकवुत असलेल्या घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दल राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे आभार मानले आहेत. Central government announces free Rations For poor, Chhagan Bhujbal thanked Sharad Pawar


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात कोरोना महामारीमुळे हाहाकार उडाला आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येने घाम फोडला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी विविध निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यामुळे राज्यात लॉकडाऊन लादण्यात आले आहे. गतवर्षी जेव्हा लॉकडाऊन लागले होते, तेव्हा केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी मोफत धान्य वाटपाची तरतूद केली होती. आता पुन्हा एकदा केंद्राने मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. यामुळे लॉकडाऊनच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमकवुत असलेल्या घटकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्राच्या या निर्णयाबद्दल राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचे आभार मानले आहेत.

    छगन भुजबळ यांचे ट्वीट

    मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी पंतप्रधान कार्यालय, पीयूष गोयल आणि शरद पवार यांना पत्र लिहून केली होती. या योजनेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जुन महिन्यांसाठी मोफत ५ किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरीकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शरद पवार यांचे आभार.”

    राज्यात सध्या लॉकडाऊन लादण्यात आलेले आहे. यामुळे अनेक व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या श्रमिकांचे काम बंद असल्याने त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यातील व एकूणच देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा वाढण्यासाठी उत्पादनात वाढीचे निर्देश दिले आहेत. ऑक्सिजनची निर्यात बंद करून खासगी तसेच सरकारी कंपन्यांना उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय लसीकरण वाढवण्यासाठी परदेशी लसींनाही तातडीने मंजुरी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची मुभा दिली आहे. आता मोफत धान्य देऊन गोरगरिबांना अल्पप्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.

    Central government announces free Rations For poor, Chhagan Bhujbal thanked Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य