• Download App
    रांजणगावच्या 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर'साठी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटी ३९ लाख MIDC कडे जमा Center disburses first phase amount to MIDC for Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon

    रांजणगावच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’साठी केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटी ३९ लाख MIDC कडे जमा

    रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता मिळालेली आहे.
    विशेष प्रतिनिधी
    पुणे : पुण्याजवळील रांजणगाव येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या  टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. Center disburses first phase amount to MIDC for Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon
    केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २०८ कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.
    रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात IFB, LG आणि Gogoro EV Scooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

    Center disburses first phase amount to MIDC for Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना