• Download App
    लाल परी आजही राज्यात धावणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप; समिती स्थापन होऊनही तिढा कायम । bus will not run in the state even today, ST workers strike for second day in a row; Even after the formation of the committee, strike will contunue

    लाल परी आजही राज्यात धावणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप; समिती स्थापन होऊनही तिढा कायम

    वृत्तसंस्था

    मुंबई : एसटी कर्मचारी संघटनांचा सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात संप सुरु आहे. २२० आगारात काम बंद आंदोलन सुरू असल्याने बस धावत नाहीत. सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन केली. पण, त्यानंतरही संप सुरु राहिल्याने तिढा कायम आहे. आज ९० टक्के कामगार हजर नव्हते.
    bus will not run in the state even today, ST workers strike for second day in a row; Even after the formation of the committee, strike will contunue



    एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. सरकारनं त्रिसदस्यीय समितीही स्थापन केली आहे. न्यायालयात याबाबत सरकारनं माहिती दिल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे आजही राज्यभरात एसटी बंद राहण्याची चिन्हं आहेत. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. दरम्यान, एसटी ठप्प झाल्यानं सरकारनं खाजगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे.

    bus will not run in the state even today, ST workers strike for second day in a row; Even after the formation of the committee, strike will contunue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!