• Download App
    बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेत अकाउंट घोटाळा; 1200 खात्यांवर बँक कर्मचाऱ्यांचेच अंगठे!!;700 खात्यांमध्ये 34 कोटींची रक्कम जमा - 54 कोटी रुपये प्राप्तिकर खात्याने गोठवले!! Buldhana Urban Credit Co-operative Bank Account Scam

    बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेत अकाउंट घोटाळा; १२०० खात्यांवर बँक कर्मचाऱ्यांचेच अंगठे!!; ७०० खात्यांमध्ये ३४ कोटींची रक्कम जमा

    54 कोटी रुपये प्राप्तिकर खात्याने गोठवले!!


    वृत्तसंस्था

    मुंबई : महाराष्ट्रात बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेत अकाउंट ओपनिंगचा घोटाळा उघडकीस आला असून केंद्रीय प्राप्तिकर खात्याने बँकेच्या मुख्यालयातील तपासणीनंतर सुमारे 54 कोटी रूपये गोठवले आहेत. Buldhana Urban Credit Co-operative Bank Account Scam

    या बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करताना तब्बल 1200 खाती पॅन कार्ड शिवाय आणि केवायसी ओळख पटविल्याशिवाय उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर यापैकी 700 खात्यांमध्ये आठवडाभरातच 34 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुमारे 54 कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर खात्याने गोठवली आहे.

    बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच खाती उघडताना त्यावर अंगठे उठविल्याचे आणि शिक्के मारल्याचे उघडकीस आले आहेत. ही बँक खाती नेमकी कोणाची आहेत याचा तपशीलवार तपास सुरू आहे. 1200 पैकी 700 खात्यामध्ये 34 कोटींहून अधिक रक्कम आठवडाभरात कशी काय जमा झाली याचा तपशील हळूहळू उघडकीस येणे अपेक्षित आहे.

    बँकेत सर्च ऑपरेशन केले असता तेथे सुमारे 54 कोटी रुपये बेहिशेबी आढळले. ते प्राप्तिकर खात्याने गोठवले आहेत. 27 सप्टेंबरला हे सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस खात्याने अधिकृतरीत्या दिली आहे.

    Buldhana Urban Credit Co-operative Bank Account Scam

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Uddhav Thackeray : देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का? उद्धव ठाकरे यांचा सवाल, ममतांचे केले कौतुक

    Maharashtra Weather Alert : राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट; विजांचाही इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्रातर्फे सतर्कतेचे आवाहन

    Supriya Sule : अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन