54 कोटी रुपये प्राप्तिकर खात्याने गोठवले!!
वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेत अकाउंट ओपनिंगचा घोटाळा उघडकीस आला असून केंद्रीय प्राप्तिकर खात्याने बँकेच्या मुख्यालयातील तपासणीनंतर सुमारे 54 कोटी रूपये गोठवले आहेत. Buldhana Urban Credit Co-operative Bank Account Scam
या बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करताना तब्बल 1200 खाती पॅन कार्ड शिवाय आणि केवायसी ओळख पटविल्याशिवाय उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर यापैकी 700 खात्यांमध्ये आठवडाभरातच 34 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुमारे 54 कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर खात्याने गोठवली आहे.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनीच खाती उघडताना त्यावर अंगठे उठविल्याचे आणि शिक्के मारल्याचे उघडकीस आले आहेत. ही बँक खाती नेमकी कोणाची आहेत याचा तपशीलवार तपास सुरू आहे. 1200 पैकी 700 खात्यामध्ये 34 कोटींहून अधिक रक्कम आठवडाभरात कशी काय जमा झाली याचा तपशील हळूहळू उघडकीस येणे अपेक्षित आहे.
बँकेत सर्च ऑपरेशन केले असता तेथे सुमारे 54 कोटी रुपये बेहिशेबी आढळले. ते प्राप्तिकर खात्याने गोठवले आहेत. 27 सप्टेंबरला हे सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस खात्याने अधिकृतरीत्या दिली आहे.
Buldhana Urban Credit Co-operative Bank Account Scam
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच