• Download App
    भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे निव्वळ छळ - संजय राऊत |BJP targest Shiv sena last five years

    भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे निव्वळ छळ – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपने पाच वर्षे आमचा निव्वळ छळ केला. आमच्या पक्षप्रमुखांविषयी बोलले जात होते. पण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे, असा चिमटा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काढला आहे.BJP targest Shiv sena last five years

    जळगावला पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले , सत्ता, राजकारण ह्या स्वतंत्र बाबी असून संघटना नेहमी महत्त्वाची असते. स्वबळ काय असते हे आपल्याला माहिती नाही. पण आगामी निवडणुका ह्या शिवसेनेच्याच बळावर लढविल्या जातील.



    देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कमजोर असला तरी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय अशक्य आहे.ते म्हणाले, राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले त्यात वावगे काही नाही.

    प्रशांत किशोर हे एका एजन्सीचे काम बघतात. त्यांच्याकडून शिवसेनेनेही काम करून घेतले आहे. ते काही राजकीय नेते नाहीत की त्यांच्या भेटीने मोठी राजकीय उलथापालथ होईल.

    BJP targest Shiv sena last five years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ