‘’…पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही.’’ असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पाटणामध्ये विरोधी पक्षांची नुकतीच एक बैठक पार पडली, या बैठकीवर भाजपाकडून टीका केली जात आहे. भाजपाच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेतून भाजपावर पलटवार केला. त्यानंतर आता शरद पवारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized NCP president Sharad Pawar
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ‘’शरद पवार, पोरकट आणि स्वतःच्याच मुलाबाळांना सत्ता मिळाली पाहिजे म्हणून कोण राजकारण करत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुध्दा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्र दिली यातच सर्व आलं.’’
याशिवाय ‘’कार्याध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करायची हा तुमचा प्रश्न आहे. पण देश वाचविण्याच्या नावाखाली तुम्ही विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहात पण तुमची एकजूट देशासाठी नाही तर तुमच्या परिवाराला सत्ता मिळावी यासाठी आहे. हे लोकांना माहीत आहे. मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली गेल्या नऊ वर्षांत जनतेचं राज्य सुरू आहे, पण तुम्हाला ते बघवत नाही.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.
याचबरोबर ,‘’म्हणून तुम्ही आमच्या राजकारणाला पोरकट राजकारण म्हणून हिणवत आहात पण जनता तुमच्या ‘ मेरा घर – मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही. कोण पोरकट राजकारण करतंय आणि कोण देशहिताचं राजकारण करतंय? हे २०२४ मध्ये जनता तुम्हाला दाखवून देईल.’’ असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार काय म्हणाले? –
भाजपाकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देताना शरद पवारंनी “सत्ताधाऱ्यांची टीका म्हणजे पोरकटपणाचे भाष्य आहे. या संपूर्ण बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चाच झाली नाही. महागाई, बेकारी, समाजातील अंतर निर्माण करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून कशी पावलं टाकली जात आहेत यावर चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढल्यास ते समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे या सगळ्याला आवर घालण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे हा बैठकीत चर्चेचा विषय होता”.
याशिवाय “मी बघतोय, गेले दोन-तीन दिवस अनेक तथाकथित नेते बोलत आहेत. हे लोक का जमले? यांनी बैठक का घेतली? वगैरे… लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही का? ते भाजपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही…”, असं म्हणत शरद पवारांनी बावनकुळेंना टोला लगावला होता.
BJP state president Chandrashekhar Bawankule criticized NCP president Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या
- कोल्हापुरात परिषद : देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाद्वारे आत्मनिर्भर होण्याचा निर्धार!!
- “सहा मुस्लीम देशांवर फेकले होते बॉम्ब” म्हणत निर्मला सीतारामन यांनी बराक ओबामांवर निशाणा साधला!
- प्रकाश आंबेडकरांचे औरंगजेब कौतुक; संभाजी राजे संतप्त, दिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेल्याचा हवाला!!
- पवारांनी अभिजीत पाटलांना “निवडल्यानंतर” भगीरथ भालकेंनी निवडला बीआरएसचा पर्याय; पवारांनी अँटीसिपेट केलेय नुकसान!!