विशेष प्रतिनिधी
मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीवर मात करून प्रचंड यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदांच्या शपथा घेतल्या. नव्या सरकारचा कारभार सुरू झाला.BJP – MNS alliance in municipal elections in maharashtra
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवा धमाका केला महाराष्ट्रात आगामी काळात महापालिका निवडणुकांमध्ये शक्य होईल तिथे नव्या पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढवू, अशी घोषणा फडणवीस यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत केली.
महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन मोठे पक्ष असताना अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या पक्षासोबत महापालिका निवडणुका लढवायची घोषणा केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवी खळबळ निर्माण झाली.
गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये महापालिका जिल्हा परिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडल्यात. त्याचा कायदेशीर मार्ग मोकळा करून कोर्टाला त्यावरचा स्टे उठवायला सांगून लवकरात लवकर निवडणूक घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
– राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती
त्याचवेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे सोबत शक्य होईल, तिथे महापालिका निवडणुकीत युती करून निवडणूक लढवायची घोषणा त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीमध्ये अडजेस्ट करता येणे शक्य नव्हते. म्हणून राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यांना मोठे यश मिळाले नाही, पण मनसेला एकूण मतसंख्या चांगली मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत शक्य होईल तिथे आम्ही मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवू, असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत नवे समीकरण उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP – MNS alliance in municipal elections in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- New government : नवे सरकार, नवे मंत्री, नवे मुद्दे; पण सरकार विरोधात लढण्यासाठी विरोधकांकडे जुनीच हत्यारे!!
- Sambhal violence : संभल हिंसाचारात एक कोटींच्या मालमत्तेचे नुकसान, हल्लेखोरांकडून वसुली करणार प्रशासन
- Sambit Patra : संबित पात्रा यांच्यावर विशेषाधिकार भंगाची नोटीस
- Gujarat : गुजरातेत तोतया ईडी टीमचा सराफा दुकानावर छापा; 11 अटकेत, 1 फरार