• Download App
    शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना आशिष शेलार यांचे राष्ट्रवादी प्रेम उफाळले; नारायण राणेंची नकळत केली माथेफिरूशी तुलना BJP MLA Ashish Shelar compared Narayan Rane With Pawar hitter

    शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना आशिष शेलार यांचे राष्ट्रवादी प्रेम उफाळले; नारायण राणेंची नकळत केली माथेफिरूशी तुलना

    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना राष्ट्रवादी काँग्रेसवरचे प्रेम अचानक उफाळून आले आहे. त्यांनी असे काही वक्तव्य केले आहे की ज्यामुळे नारायण राणे यांची तुलनाच एक प्रकारे माथेफिरूशी होऊन गेली आहे. BJP MLA Ashish Shelar compared Narayan Rane With Pawar hitter

    त्याचे झाले असे : नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा त्यांच्या मायभूमीत म्हणजे सिंधुदुर्गात आहे. तेथे ठाकरे – पवार सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या निमित्ताने जमाव बंदी लागू केली आहे. त्यावर संतापून टीका करताना अशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये एका माथेफिरूने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कानशिलात भडकावली होती. प्रत्यक्ष कानशिलात भडकावून देखील राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती.

    मात्र शिवसेना इतकी चवताळली आहे की नुसत्या कानाखाली लावण्याचा आवाज काढल्यानंतर त्यांनी राणे आणि भाजप द्वेषापोटी संपूर्ण जनतेलाच वेठीला धरले आहे. आणि म्हणूनच त्यांनी सिंधुदुर्गात जमाव बंदी लागू केली आहे.



     

    हे वक्तव्य करताना आशिष शेलार यांच्या हे मात्र लक्षात आलेले दिसत नाही, की आपण अनावश्यक राष्ट्रवादीची भलामण करतो आहोत आणि त्याच वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तुलना दिल्लीतल्या माथेफिरुशी करत आहोत.

    अर्थात अशिष शेलार यांचे राष्ट्रवादीवरचे प्रेम नवे नाही. ते मुंबईतले नेते असल्यामुळे शिवसेनेविषयी त्यांच्या मनात अढी असणे स्वाभाविक आहेत. परंतु ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी विशेष जवळीक आहे. त्यातून तर त्यांनी हे वक्तव्य केले नाही ना, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

    BJP MLA Ashish Shelar compared Narayan Rane With Pawar hitter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस