• Download App
    देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर; शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट BIG BREAKING NEWS; Devendra fadanavis meets sharad pawar at silver oak in mumbai

    BIG BREAKING NEWS : देवेंद्र फडणवीस सिल्वर ओकवर; शरद पवारांची घेतली सदिच्छा भेट

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवर ठाकरे – पवार सरकारवर पत्रकार परिषदेत कठोर प्रहार करणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक सिल्वर ओकवर जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. BIG BREAKING NEWS; Devendra fadanavis meets sharad pawar at silver oak in mumbai

    स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच पवारांच्या घरात जाऊन भेट घेतल्याचा फोटो फेसबुकवर शेअर केला. हा फोटो शेअर केल्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

    छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांसकट विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवी समीकरणे जूळत असल्याच्या बातम्या चालू झाल्या. यावर जोरदार चर्चा सुरू असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच बरोबर राज्यात नव्या समीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे.

    BIG BREAKING NEWS; Devendra fadanavis meets sharad pawar at silver oak in mumbai

    Related posts

    उद्धव ठाकरेंना सत्तेच्या ऑफरची फडणवीसांची खेळी; ठाकरे बंधूंच्या ऐक्यात आणि उरल्या सुरल्या महाविकास आघाडीत पाचर मारून ठेवली!!

    ठाकरे – आंबेडकर युतीची घोषणा कागदावरून देखील गायब; शिंदे सेना – आनंदराज आंबेडकरांची युतीची घोषणा; महायुतीची बेरीज की वजाबाकी??

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे- आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाची युती; उद्या अधिकृत घोषणेची शक्यता; मनपा-जि.प. निवडणुका लक्ष्य