शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे.Be careful! Shaheen’s impact on Maharashtra and Gujarat coastline, hurricane Shaheen crisis in Arabian Sea
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुलाब चक्रीवादळाचा एक भाग वेगळा होऊन तयार झालेल्या शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रावर शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे.
महाराष्ट्र, गुजरातमध्ये या शाहीन चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या वादळामुळे समुद्रात भरती येण्याची शक्यता आहे.येत्या ३ ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गुजरात आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर जाणवणार असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे समुद्रात भरती येण्याची शक्यता असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकतील, असं सांगण्यात आलं आहे.
कोस्ट गार्डच्या पाच बोटी अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत. पुढच्या 24 तासात अरबी समुद्रात मोठ्या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीवरच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान हवामान विभागानं पुढं म्हटले आहे की , पुढील तीन दिवसांनंतर हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार असून तो पाकिस्तानच्या दिशेने सरकणार आहे. मात्र तोपर्यंत गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Be careful! Shaheen’s impact on Maharashtra and Gujarat coastline, hurricane Shaheen crisis in Arabian Sea
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल २५ वर्षानंतर तामीळनाडूच्या महिला मंत्र्याला भ्रष्टाचाराचा आरोपावरून पाच वर्षे शिक्षा
- दिल्ली रेस्टॉरंट जिथे “साडीमध्ये प्रवेश नाकारला”, परवाना बंद करण्यास सांगितले
- जानेवारीत सर्व पुणेकरांचे लसीकरण पूर्ण होणार; महापालिकेचा दावा, आतापर्यंत १० लाख ४६ हजार जणांना दोन डोस
- महिला रेल्वे प्रवाशाचे प्राण पोलिस कॉन्स्टेबलने वाचवले; कल्याणमध्ये धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न