• Download App
    बारामतीला जिल्हा बँकेतून कारखाना घेण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही : नारायण राणे Baramati will not be given a loan from here to factory , Narayan Rane's attack after the victory of DCC Bank

    बारामतीला जिल्हा बँकेतून कारखाना घेण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही – नारायण राणे

    वृत्तसंस्था

    सिंधुदुर्ग : बारामतीला जिल्हा बँकेतून कारखाना घेण्यासाठी कर्ज दिले जाणार नाही, असे नारायण राणेंनी म्हटले. जिल्हा बँकेत अप्रगेडेशन करण्याचा प्रयत्न आहे, एमएसएमई आणि जिल्हा बँक यांच्या माध्यमातून स्थानिकांसाठी काम केले जाईल असेही राणेंनी स्पष्ट केले. Baramati will not be given a loan from here to factory , Narayan Rane’s attack after the victory of DCC Bank

    सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखालील भाजपाने शिवसेनेला धोबीपछाड दिला आहे. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधला.



    ते म्हणाले, जिल्हा बँक ही शेतकरी अन् नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी एग्रीकल्चरचे व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट बनवले जातील. तसेच, ही इंडस्ट्री स्थानिक शेतकऱ्यांना दिली जाईल.

    भाजपचा ११ जागांवर विजय

    जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलला ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या खात्यात ८ जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक झाल्यानंतर सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यातील परिस्थिती संवेदनशील झाली होती.

    Baramati will not be given a loan from here to factory , Narayan Rane’s attack after the victory of DCC Bank

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!