• Download App
    नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून किती छळ झाला याची जाणीव कॉँग्रेस नेत्यांना नाही का? रावसाहेब दानवे यांचा सवाल|Aren't the Congress leaders aware of how much persecution was inflicted by the CBI when Narendra Modi was the Chief Minister of Gujarat? Question by Raosaheb Danve

    नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून किती छळ झाला याची जाणीव कॉँग्रेस नेत्यांना नाही का? रावसाहेब दानवे यांचा सवाल

    विशेष प्रतिनिधी

    शिर्डी : भाजपाच्या लोकांना ईडीचा आणि सीबीआय त्रास झाला नाही का? नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांचा किती छळ झाला याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही का? सीबीआय चौकशी झाल्यानंतर मोदी जेव्हा बाहेर आले तेव्हा पत्रकारांना फक्त नमस्कार करून निघून गेले होते. केंद्राकडून कुठेही यंत्रणाचा गैरवापर केला जात नाही, असे मत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यांनी व्यक्त केले.Aren’t the Congress leaders aware of how much persecution was inflicted by the CBI when Narendra Modi was the Chief Minister of Gujarat? Question by Raosaheb Danve

    शिर्डीमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दानवे म्हणाले, नवाब मलिकांना ईडीने पकडल्यानंतर त्यांनी फारच बहादूरकी केल्यासारखा हात वर करून जल्लोष केला. ही काय वागण्याची पद्धत झाली का? अमित शहांना जेलमध्ये टाकले, नरेंद्र मोदींचा छळ केला तेव्हा आम्ही असेच आरोप केले का?



    सुरेश कलमाडी, अशोक चव्हाण आणि लालू प्रसादांची चौकशी सीबीआयने केली तेव्हा आमचे सरकार होते का? हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनावाल्यांना दिसत नाही का? सध्या बिलकुल सुडाचे राजकारण सुरू नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनास १०० टक्के पाठिंबा आहे.

    मराठा आरक्षणाबाबत राज्याने सुप्रीममध्ये योग्य पुरावे न दिल्याने आरक्षणावर गदा आली. तामिळनाडूसारख्या इतर राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले, कारण योग्य ती बाजू त्यांनी कोर्टासमोर मांडली. मात्र, हे राज्य सरकारचे अपयश असून मराठा समाजावर त्यांनी अन्याय केलाय. राज्य सरकारने संभाजी राजेंना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.

    नवाब मलिक यांच्यावर दाऊदची इब्राहिमची प्रॉपर्टी खरेदी केल्याप्रकरणी अटक केली. त्यामुळे राज्यातल्या तीन पक्षांच्या सरकारमधील मंत्र्यांनी उपोषण केले. दाऊद इब्राहिमला पाठिंबा देण्यासाठीच हे उपोषणाला बसले की काय, अशा प्रकारची शंका राज्यातल्या जनतेच्या मनात आता यायला लागलीय, असा टोलाही दानवेंनी लगावला.

    Aren’t the Congress leaders aware of how much persecution was inflicted by the CBI when Narendra Modi was the Chief Minister of Gujarat? Question by Raosaheb Danve

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल