प्रतिनिधी
पुणे – पुण्यातील अंबिल ओढ्यात अतिक्रमण विरोधी कारवाई झाली, त्या संदर्भात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला टार्गेट करण्यासाठी तेथे गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना “अजित पवार मुर्दाबाद” या घोषणेला सामोरे जावे लागले. शिवाय अजित पवार विरोधी घोषणा या भाजप समर्थकांनी दिल्या नाहीत, तर त्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले. Anti-encroachment action in Pune’s Ambil stream
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद… महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद… अशा घोषणा दिल्या. सुप्रिया सुळे यांनी आज सकाळीच हडपसर येथील रामटेकडी कचरा प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली.
पुणे महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची त्यांनी भेटही घेतली. खासदार सुळे यांनी जमिनीवर बसून तिथल्या महिलांशी संवाद साधला.
त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी मुर्दाबाद या घोषणा त्यांना ऐकाव्या लागल्या. या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे यांनी संयम राखण्याचे आणि या विषयात राजकारण करू नये, असे आवाहन केले.
‘मी इथे राजकारण करण्यासाठी आलेले नाही. हा प्रश्न संवेदनशीलपणे सोडविणे गरजेचे आहे,’ असे त्या म्हणाल्या. त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पाडलेली स्थानिकांची घरे बांधून देण्यात यावीत, अशी मागणी स्थानिकांनी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
Anti-encroachment action in Pune’s Ambil stream
महत्त्वाच्या बातम्या