• Download App
    Anjali Damania अंजली दमानिया यांचा गंभीीर आरोप- धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून

    Anjali Damania : अंजली दमानिया यांचा गंभीीर आरोप- धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून त्रास; अश्लील कमेंट, दिवसाला 700 ते 800 कॉल

    Anjali Damania

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Anjali Damania धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून मला दिवसाला 700 ते 800 कॉल केले जात आहेत. या माध्यमातून मला धमकी देण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला आहे. इतकेच नाही तर सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून माझ्यावर अश्लील कमेंट केल्या जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेली एसआयटी बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. नवीन एसटी स्थापन करा, तसेच त्यासाठी राज्याबाहेरून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.Anjali Damania

    मी कोणत्याही समाजाच्या विरोधात आजपर्यंत बोललेले नाही. वंजारी समाजाबद्दल देखील मी कधीही बोललेले नाही. मात्र, परळी मध्ये जे सर्व सुरू आहे त्या विरोधात मी बोलले. मात्र माझे स्टेटमेंट तोडून मोडून समाज माध्यमावर टाकले जात आहे. त्यामुळे मला धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते धमकीसाठी फोन करत आहेत. फोन करणारे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या संदर्भात आपण लवकरच पोलिस महासंचालकांची भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.



    राज्य सरकारमध्ये कोणत्याही जिल्ह्यासाठी बिंदू नामावली नावाचा प्रकार असतो. बिंदू नामावलीनुसार सर्व समाजातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मात्र, बीडमध्ये अशी नियुक्ती करण्यात आली आहे का? यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बीडमध्ये नियुक्त असलेल्या सर्व अधिकार्‍यांची तात्काळ बिंदू नामावलीनुसार नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

    एसआयटी आणि सीआयडी तपास धुळ फेक असल्याचा आरोप

    बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी बीड मधील अनेक प्रकरणात धनंजय मुंडे यांचा समावेश असल्याचा आरोप केला. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या विरोधातील आंदोलनात देखील त्यांनी सहभाग नोंदवला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेली एसआयटी आणि सीआयडी तपास धुळ फेक असल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केला आहे.

    Anjali Damania’s serious allegations – harassment from Dhananjay Munde’s workers; obscene comments, 700 to 800 calls a day

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस