Anjali Damania : प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे कपटी नेते; राष्ट्रवादीतील घडामोडींवर अंजली दमानियांची टीका, सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचा इशारा
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका केली आहे. हे दोघेही “अतिशय कपटी नेते” असून पक्षात मोठा राजकीय कट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वेळेत सावध होण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.