• Download App
    Anjali Damania Demands Action on Ashok Kharat; Questions Political Funding अंजली दमानिया म्हणाल्या- खरातला मोठं करणाऱ्या राजकारण्यांची नावे समोर यावीत, सातबाऱ्यावर अधिकाऱ्यांच्या पत्नीचे नाव कसे

    Anjali Damania : अंजली दमानिया म्हणाल्या- खरातला मोठं करणाऱ्या राजकारण्यांची नावे समोर यावीत, सातबाऱ्यावर अधिकाऱ्यांच्या पत्नीचे नाव कसे

    Anjali Damania

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Anjali Damania अशोक खरातसारखा अघोरी आणि विकृत माणूस पुन्हा कधीही जेलबाहेर येऊ शकणार नाही, याची खात्री व्यवस्थापनाने करावी. जर राजकारणासाठी किंवा कोणाला वाचवण्यासाठी त्याला बाहेर काढले, तर मी गप्प बसणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे. हे सगळे काही एकटा माणूस बनवू शकत नाही, त्यांचे सहकारी होते.Anjali Damania

    अंजली दमानिया म्हणाल्या की, आपला पैसे सरकार मंदिरासाठी वापरते पण त्यातून विकास कामे करत नाही. मविआने भोंदू बाबा खरातला धरणाचे पाणी दिले. जयकुमार रावल यांनी त्यांना मंदिरासाठी निधी दिला. त्यांना शाळा, रुग्णालयासाठी निधी नाही, कामांसाठी निधी नाही पण खरातच्या ट्रस्टच्या धशात घालण्यासाठी निधी आहे. खरात प्रकरणी गुन्हा दाखल केला जात नव्हता. त्याला काहीही म्हटले तरी ते कमीच आहे. या खरातला मोठे केले ते लोकांनी आणि राजकारण्यांनी केले आहे.Anjali Damania



    भांडे पाटलांना बडतर्फ केले पाहिजे

    अंजली दमानिया म्हणाल्या की, खरात प्रकरणातील राजकारणी लोकांची नावे समोर आली पाहिजे. उपायुक्त अभिजीत भांडे पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचे नावच समोर आले आहे. मुंबईतील एक अपर जिल्हाधिकारी आहेत त्यांचे सुद्धा नाव समोर येईल. पण केवळ बदलू करणे म्हणजे न्याय असे काही नाही. या प्रकरणी सखोल तपास झाला पाहिजे, त्यांच्या आर्थिक गोष्टी तपासल्या पाहिजेत. प्रीती अभिजीत भांडे पाटील यांचे नाव त्या सातबाऱ्यावर कसे होते.मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातून बदली करत त्यांना महसूल विभागात पाठवण्यात आले आहे ते तिथेही अशीच घाण करणार, त्यांना बडतर्फ केले पाहिजे.

    पवारांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यायला हवा

    अंजली दमानिया म्हणाल्या की, अशोक खरात प्रकरणी माझी माहिती मी दाते सर यांच्याकडे देणार आहे. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आधीच द्यायला हवा होता. सुनेत्रा पवार या स्वत:ला पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणत आहे त्यांनी हा राजीनामा घेणं गरजेचे होते पण त्यांनी तसे केले नाही. या लोकांना जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज नाही. नाशिकमध्ये पोलिसांनी खरातची जी हालत केली ती बघून मनातून प्रत्येक स्त्री ही सुखावली असेल.

    Anjali Damania Demands Action on Ashok Kharat; Questions Political Funding

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर

    राम भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखणीतून साकारली नवी राम धून!!

    Jitendra Awhad : 38 आमदारांनी भोंदू खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या; अशोक खरात जिवंत राहील याची व्यवस्था करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी