वृत्तसंस्था
पिंपरी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी हायकोर्टाच्या आदेशानुसार सुरु आहे. पण, ही चौकशी म्हणजे भाजपकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप होत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्याविरोधात भाजप अवमान याचिका दाखल करेल. असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरीत दिला. Anil Deshmukh’s CBI probe as per High Court order
पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले, ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे.
ते म्हणाले, शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोईच्या भूमिका असतात. त्यांना अनुकूल निकाल लागला की न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश आला की शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिकाही निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते. अशी ‘हम करे सो कायदा’, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही.
भाजपाला विधानसभा निवडणुकीत जनादेश दिला होता. विश्वासघातामुळे भाजपा सत्ताधारी होण्याच्या ऐवजी विरोधी पक्ष झाला. परंतु, विरोधी पक्ष म्हणून सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याची भाजप उत्तमपणे पार पाडतच राहील. असेही त्यांनी सांगितले.
Anil Deshmukh’s CBI probe as per High Court order
महत्वाच्या बातम्या
- आरटीपीसीआर चाचणीचे नाव घेताच युनायटेड एअरलाइन्सने रिकामेच विमान नेले न्यूयॉर्कला
- मे मध्ये कोरोनाची सुनामीच येणार, ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे आणणाऱ्यांना फासावर चढवण्याचा न्यायालयाचा इशारा
- राजधानी दिल्ली ऑक्सीजन अभावी बेहाल, केंद्र व राज्य सरकार हतबल
- भारताला मोठ्या प्रमाणात लशी देण्यासाठी बायडेन प्रशासनावर अमेरिकेत दबाव वाढला