नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णर्यावर डोळ्यात अंजन घातले आहे. हा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही तर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. Anil Ambani’s son critisises lockdown decision, said lockdown is conspiracy
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णर्यावर डोळ्यात अंजन घातले आहे. हा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही तर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील ठाकरे सरकारने कोरोना रोखण्याच्या निर्बंधांच्या नावाखाली अर्थचक्रच ठप्प करून टाकले आहे. यावर चीड व्यक्त करताना रिलायन्स कॅपीटलचे कार्यकारी संचालक असलेला अनमोल अंबानी म्हणाला, नेत्यांवर, अभिनेत्यांवर काही बंधने नाहीत मग व्यापारावर का घातली जात आहेत? अर्थव्यवस्थेच्या गाभ्यावरच लॉकडाऊन परिणाम करत आहे. व्यावसायिक अभिनेते आपल्या चित्रपटांचे शुटींग करत आहेत.
नेते गर्दीच्या समोर भाषणे करत आहेत. क्रिकेटपटू रात्री उशिरापर्यत क्रिकेट खेळत आहेत. हे सगळे जीवनावश्यक आहे मग उद्योगव्यवसाय जीवनावश्यक नाही का? गरजेचे नक्की आहे तरी काय? प्रत्येकालाच त्याचे काम महत्वाचे वाटते. पण तेच सरकार करून देत नाही.
अनमोल अंबानी म्हणाले, लॉकडाऊनने समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून टाकला आहे. आपली अर्थव्यवस्था त्यामुळे बरबाद होऊ लागली आहे. रोजंदारीवरील मजुरांपासून ते व्यावयायिक आणि छोट्या उद्योगातील कर्मचाºयांपासून ते हॉटेल, रेस्टॉरन्ट, ढाब्यावर काम करणारे, कापड दुकानदार, मिल मजूर या सगळ्यांचेच नुकसान होत आहे. हे सगळे पूर्ण बरबाद होऊ लागले आहे.
हा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही. मला वाटते की कशावर तरी नियंत्रण ठेवणसाठी लॉकडाऊन लावलेला आहे. काहीतरी अनामिक मोठे षडयंत्र यामागे आहे. त्या जाळ्यात आपल्याला ओढण्यासाठी लॉकडाऊन लावला असावा.
Anil Ambani’s son critisises lockdown decision, said lockdown is conspiracy
इतर बातम्या वाचा…
- ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?
- इराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य
- मुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार
- मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका
- अनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार