Thursday, 8 May 2025
  • Download App
    अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप|Andheri by-election NCP support to Shiv Sena, Shinde group accused of being part of political conspiracy

    अंधेरी पोटनिवडणूक : शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा, शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप

    प्रतिनिधी

    मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठिंबा असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची ही जागा प्रचंड मताने निवडून येईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी दिली. Andheri by-election NCP support to Shiv Sena, Shinde group accused of being part of political conspiracy

    ते पुढे म्हणाले की, स्वतःला शिवसेना म्हणवून घेणार्‍यांना या निवडणुकीत भाजपने साधं विचारलंही नाही आणि भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेना म्हणून शिंदे गटाला जवळ केले असेल, तर ती जागा सोडायला हवी होती. मात्र तसे न करता भाजपने शिंदे गटाला डावलून भाजपची उमेदवारी जाहीर केली आहे. यातून भाजपची काय रणनीती आहे हे सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे शिवसेनेची ही जागा दणदणीत मतांनी निवडून आणू, असेही ते म्हणाले.


     


    उद्धव ठाकरेंचे कौतुक

    शिंदे गटावर टीका करताना ते म्हणाले की, 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आमचे व कॉंग्रेसचे समर्थन हे ठाकरेंना आहे. उत्कृष्ट कामगिरीमुळेच देशाच्या 5 टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये ठाकरेंचे नाव आले. आता झालेला शिंदे गट हा राजकीय षडयंत्राचा भाग होता. त्यामुळे खरी शिवसेना ही बाळासाहेबांच्या आणि उध्दव ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना असून त्यांच्यासोबत राष्ट्रवादी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

    सर्वपक्षीयांची मोट बांधण्याचे पवारांचे प्रयत्न

    ते पुढे म्हणाले की, देशातील सर्व पक्षांची मोट बांधून मोदी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी शरद पवार हे आग्रही होते आणि आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे महाराष्ट्रात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. जे जे लोकं भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढे येत आहेत त्यांना नक्कीच समर्थन असणार आहे. ज्यांची भाजपच्या विरोधात भूमिका आहे त्यांना राष्ट्रवादी नक्की बळ देईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे, महेश चव्हाण हेही उपस्थित होते.

    Andheri by-election NCP support to Shiv Sena, Shinde group accused of being part of political conspiracy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसची केली “चव्हाण + रेड्डी काँग्रेस”; पुढच्या पिढीला दिले एकत्रीकरणाचे अधिकार!!

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस