Sanjay Raut : लोक म्हणतच होते धस कधीही पलटी मारतील, संजय राऊत यांची टीका
भाजपचे आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. मला तेव्हाच लोकांनी समजावलं की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारतील, अशी टीका त्यांनी केली आहे.बीडच्या लोकांनी मला त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असं सांगितलं होतं, असेही राऊत म्हणाले.