• Download App
    Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य

    Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला.

    हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी जाहीर केला होता.

    50 tourist spots in Jammu and Kashmir closed for tourists after Pahalgam terror attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शेतकरी कर्जमाफीसाठी मोठा दिलासा; २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ!!

    आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मटण – मांस विक्रीवर बंदी; पण खवचट मराठी माध्यमांना “खटकली’ खवय्यांची “कोंडी”!!

    सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान मिळताच राष्ट्रवादी झटकन explanation mode मध्ये!!; सच्चिदानंद सिंह यांच्या मागे कुणाची चालली बुद्धी??