Devendra Fadnavis : ‘महाटेक’च्या माध्यमातून महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या बैठकीत राज्याच्या भविष्यवेधी विकासासाठी भूस्थानिक आणि माहिती तंत्रज्ञान यांची सांगड घालून ‘महाटेक’ संस्थेची निर्मिती करण्याचे निर्देश दिले. या संस्थेमुळे राज्याच्या नियोजन प्रक्रियेला गती मिळेल आणि ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्तीत मोठा हातभार लागेल.