• Download App
    Amit Shah Dhananjay Munde Meeting Anjali Damania Devendra Fadnavis Maharashtra Politics Photos Videos Report अमित शहा- धनंजय मुंडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; मुंडेंना मंत्री केले तर फडणवीसांना माफ करणार नाही- अंजली दमानिया

    Amit shah : अमित शहा- धनंजय मुंडे भेटीने राजकीय चर्चांना उधाण; मुंडेंना मंत्री केले तर फडणवीसांना माफ करणार नाही- अंजली दमानिया

    Amit shah

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Amit shah  महापालिकेच्या तोंडावर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणुकांची तयारी, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. इतकेच नव्हे, तर यात भर म्हणून आता अजित पवारांच्याच पक्षातील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.Amit shah

    माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची शक्यता असतानाच धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेणे हा योगायोग नसून मंत्रिपदासाठी सुरू असलेली सेटिंग आहे की काय? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या जन्मी माफ करणार नसल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे.Amit shah Amit Shah Dhananjay Munde Meeting Anjali Damania Devendra Fadnavis Maharashtra Politics Photos Videos Report



    अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटले की, ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणणाऱ्या पक्षाचे अमित शहा, मला म्हणजे भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या व्यक्तिला वेळ देत नाहीत, पण अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि आता धनंजय मुंडे यांना भेटण्याची वेळ देतात. यात काय ते समजून जा, असे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच भाजपला काय बोलू, शब्दच उरले नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली आहे.

    … तर फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही

    पुढे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या आरोपांची थेट यादीच केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या धनंजय मुंडेंवर 1) बीड बँक घोटाळ्याचे आरोप आहेत, 2) बंदूक राज आणल्याचे आरोप आहेत, 3) महाजेनको मधून राख चोरल्याचे आरोप आहेत, 4) आवादा कंपनीकडून खंडणी मागीतल्याचे आरोप आहेत, 5) कृषी घोटाळ्याचे आरोप आहेत, 6) दहशत, बंदूकराज, गुंडाराज केल्याचे आरोप आहेत आणि सगळ्यात किळसवाणे म्हणजे ज्या क्रूर पद्धतीने स्व. संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी करवून घेतली त्या विकृत वाल्मीक कराडची उणीव भासते, असे म्हणणारे धनंजय मुंडे जर परत मंत्री म्हणून परत आले, तर या भाजपचा बहिष्कार लोकांनी केला पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. तसेच जर फडणवीसांनी हे होऊ दिले, तर मी या जन्मी त्यांना माफ करणार नाही, असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट म्हटले आहे.

    Amit Shah Dhananjay Munde Meeting Anjali Damania Devendra Fadnavis Maharashtra Politics Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Valmik Karad : वाल्मिक कराडला हायकोर्टाचा मोठा झटका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात जामीन फेटाळला; ठोस पुराव्यांच्या आधारे महत्त्वपूर्ण निर्णय

    माणिकरावांचा राजीनामा स्वीकारताना अजितदादांच्या लेखी नैतिकतेची भाषा, पण पार्थच्या जमीन घोटाळ्यात नैतिकता टांगली खुंटीला!!

    पवार काका – पुतण्याच्या दोन राष्ट्रवादींच्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेची पाचर; पुणे + पिंपरी – चिंचवड मध्ये घातला अडसर!!