• Download App
    AMIT SHAH : अतिथी देवो भव : ! स्वत:चा राखीव सूट अमित शाहंना-वाह उपमुख्यमंत्री;महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन । AMIT SHAH : Atithi Devo Bhav:! Self-reserved suit Amit Shahna-Wow Deputy Chief Minister; Darshan of Maharashtra's culture

    AMIT SHAH : अतिथी देवो भव : ! स्वत:चा राखीव सूट अमित शाहंना-वाह उपमुख्यमंत्री;महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : आज अमित शाह प्रवरानगर येथे आहेत त्यानंतर ते शिर्डीत दर्शन घेणार असून मुक्काम पुण्यात करणार आहेत. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पुण्यातला व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमधला राखीव सूट दिला आहे. राजकीय मतभेद विसरून अजित पवारांनी अतिथी देवो भव: चे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. AMIT SHAH : Atithi Devo Bhav:! Self-reserved suit Amit Shahna-Wow Deputy Chief Minister; Darshan of Maharashtra’s culture



    अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट गृहमंत्र्यांसाठी दिला आहे. अमित शाह यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर,दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शाह यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिला.

    सहकार मंत्री झाल्यावर अमित शाह पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे देण्यात आली. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकरल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत.

    AMIT SHAH : Atithi Devo Bhav:! Self-reserved suit Amit Shahna-Wow Deputy Chief Minister; Darshan of Maharashtra’s culture

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस