विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar पुण्यात एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला. यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात आधीच भाषेचा वाद सुरू असताना अशा प्रकारच्या नाऱ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.Ajit Pawar
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यात अमित शहा यांचे दोन-तीन कार्यक्रम झाले. पहिल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलले नंतर मी एका कार्यक्रमात होतो. मी असे पर्यंत तर मी असे काही ऐकले नाही. कारण मी माझा कार्यक्रम झाला की निघून आलो होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे काय म्हणाले हे मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मुंबईतील एका उद्योजकाने मी मराठी बोलणार नाही असे म्हणत थेट राज ठाकरेंना आव्हान दिले आहे. यावर प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, आपला देश हा अनेक जाती धर्मात विखुरला गेलेला देश आहे. अनेक भाषा बोलल्या जातात. 14 महत्त्वाच्या भाषांचा उल्लेख केला जातो. आपल्या महाराष्ट्रातील मातृभाषा ही मराठी आहे. इतके वर्ष आपण प्रयत्न करत होतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तो दर्जा दिला. आपल्या महाराष्ट्रात जो कोणी शिक्षण घेतो त्याला मराठी लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे.
शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मराठी भाषा ही सक्तीची सुद्धा केली आहे. आपण इंग्रजीत शिका किंवा इतर कोणत्याही माध्यमात शिका त्यात मराठी असणारच. कोल्हापूर भागातील सीमावर्ती गावात्या लोकांना महाराष्ट्रात यायचे आहे. तिथल्या कर्नाटक सरकारने तिथे कानडी भाषा सक्तीची केली आहे. मराठी जवळपास बंदच केली आहे. परंतु, तिथल्या भागातील अनेक शाळांमध्ये आपण आपल्या शाळांमध्ये मराठीची सक्ती केली आहे.
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी शिकले पाहिजे
मुंबई हे कॉस्मो पॉलिटन शहर आहे. इथे अनेक भागांतून लोक राहायला येतात. महाराष्ट्रात राहायचे असेल तर तुमच्या मुलांना शाळेत मराठी शिकवले पाहिजे, असेच आमचे धोरण आहे. पण त्यांनी अशा पद्धतीचे वक्तव्य का केले असेल, यामागची पार्श्वभूमी काय आहे हे बघावे लागेल. कारण मी आत्ता पुण्यातून आलो. आता त्याला मराठी येतच नसेल तर तो म्हणणारच की बाबा मला येत नाही मराठी. कोणतीही भाषा बोलण्याचा संविधानाने दिलेला अधिकार आहे. पण मराठी बहुतेकांना समजते. तुम्ही ज्या राज्यात राहतात तिथली नवीन पिढी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असते. जुने लोक तेवढा प्रयत्न करत नाहीत, असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar: ‘Learn Marathi to Live in Maharashtra’; Reacts to Industrialist’s Tweet
महत्वाच्या बातम्या
- संघ + सेवा सहयोग उपक्रमाची 10 वर्षे : निर्मल वारी उपक्रमामुळे वारी मार्गातील गावांमधील अस्वच्छता घटली तब्बल 80 % !!
- ICMR : कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास; ICMRचा दावा- लसीशी याचा संबंध नाही
- Delhi : दिल्ली- जुन्या वाहनांसाठी ‘नो-फ्यूल’ आदेश मागे घेण्याची तयारी; मंत्री म्हणाले- प्रदूषण थांबवायला हवे
- Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप