प्रतिनिधी
भंडारा : महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीतले दोन्ही गट उतावळे आहेत. त्यामुळे अजितदादांचा “भावी मुख्यमंत्री” म्हणून उल्लेख पोस्टर पासून वेगवेगळ्या मुलाखतींमध्येही होतो. देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कन्क्लेव्हच्या मुलाखतीत अजितदादांना मुख्यमंत्री करायचेच असेल, तर 6 महिन्यांसाठी कशाला 5 वर्षांसाठी करू, असे खोचक वक्तव्य केले. त्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदनिष्ठ गटाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण मुख्यमंत्री अजित पवारांना पहिला हार घालू, असे वक्तव्य केले. ajit pawar after 20-25 year become chief minister
मात्र अजित पवारांना मुख्यमंत्री बनवायला निघालेल्या उतावळ्या नेत्यांना शिंदे – फडणवीस सरकारमधील भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी जोरदार टोला हाणला आहे. “होतील, अजितदादा मुख्यमंत्री होतील, पण आणखी 20 – 25 वर्षांनी!!”, असे वक्तव्य करून अतुल सावे यांनी अजितदादांना मुख्यमंत्री करायला निघालेल्या उतावळ्या नेत्यांची हवा काढली आहे.
अजित पवारांना 6 महिन्यांसाठी नाही, 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री करू, असे जरी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असले, तरी कोणत्या 5 वर्षांमध्ये हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे पुढच्या 10 – 15 – 20 – 25 वर्षानंतर ते कधीही मुख्यमंत्री होतील, असे खोचक उद्गार अतुल सावे यांनी काढले. मुंबईतील मंत्रालयातील एका बैठकीत भाजपच्या मंत्र्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झापल्याच्या बातम्या मध्यंतरी काही मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. ते मंत्री अतुल सावे होते. पण आता मात्र अतुल सावे यांनी अजितदादांच्या त्या कथित झापण्याची जोरदार परतफेड केली आणि अजित पवार 20 – 25 वर्षांनंतर मुख्यमंत्री होतील, असे सांगून त्यांची खिल्ली उडवली.
अजित पवार आत्ता 64 वर्षांचे आहेत. अजून 20 वर्षांनी ते 84 वर्षांचे होतील आणि 25 वर्षांनी ते 89 वर्षांचे होतील. त्यावेळी ते मुख्यमंत्री असतील, असेच अतुल सावेंनी खोचक सूचित केले आहे.
ajit pawar after 20-25 year become chief minister
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”
- Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!
- Asian Games : भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यावर मोदींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले…
- देवरिया हत्याकांड प्रकरणी आणखी २३ अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्री योगींची कडक कारवाई