• Download App
    नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी?? after failure of getting full majority shivsena and NCP leaders make a vow to make eknath shinde and ajit pawar chief minister of maharashtra

    नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी??

    नाशिक : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांनी तब्बल 400 वर्षांपूर्वी नवस सायासाचा फोलपणा अधोरेखित केला आहे. “नवसे कन्या पुत्र होती, तर काय करणे लागे पती??”, असे त्यांनी एका अभंगात विचारले आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेत या संतवचनाचा हवाला अनेक जण देतात. फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा जप करतात. पण ते नवस सायास केल्याशिवाय राहात नाहीत, याचे प्रत्यंतर याच गणेशोत्सवात आले. after failure of getting full majority shivsena and NCP leaders make a vow to make eknath shinde and ajit pawar chief minister of maharashtra

    भाजप सोडून बाकीच्या पक्षांचे नेते मुख्यमंत्री होण्यासाठी एवढे उतावीळ झाले आहेत की त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी आपापली नावे “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टरवर चढवली, कोणी लाडू वर लिहिली आणि तेही कमी पडले म्हणून की काय गणपती बाप्पांना नवस बोलून बसले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी एवढे उतावीळ झालेत, की त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी अजितदादा मुख्यमंत्री होवोत, असा नवस बोलणारी चिठ्ठीच ठेवली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी 145 आमदार लागतात. ते आपल्याकडे नाहीत. त्यामुळे आपण मुख्यमंत्रीपदाची आशा धरली आहे, असे कृपया जगजाहीर करू नका, असे खुद्द अजितदादांनाच सांगावे लागले. पण ऐकतील तर ते कार्यकर्ते कसले!! त्यांनी आपला हेका अजून सोडलेला नाही.

    राष्ट्रवादी तर “भावी मुख्यमंत्र्यांची” अख्खी रांग आहे. त्यातले तीन पवार घरातलेच आहेत. राष्ट्रवादीने जन्मापासून फक्त 5 वर्षांचा सत्ता सासुरवास सोसला. म्हणजे सत्तेपासून बाहेर राहिले. बाकी सगळी वर्षे ते सत्तेवरच होते. म्हणजे सुरुवातीला काँग्रेसच्या सत्तेच्या वळचणीला होते. आज अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आहेत. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची हौस अजून तरी भागू शकलेली नाही. म्हणून हे नवस सायासाचे प्रकार सुरू झाले आहेत. पहिल्या टर्मचे आमदार रोहित पवार यांना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “भावी मुख्यमंत्री” म्हणून पोस्टर वर चढवून ठेवले. कारण ते शरद पवारांचे नातू आहेत. बाकी सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे “भावी मुख्यमंत्री” पोस्टरच्या रांगेत आहेतच.



    शिवसेनेत अस्वस्थता

    पण राष्ट्रवादीतली ही भावी मुख्यमंत्र्यांची वाढती रांग पाहून शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली आणि शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणीचा नवसाचा मोदक घेतला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य कायम राहू देत, असा नवस संतोष बांगर बोलले. यातला एकनाथ शिंदे 2024 नंतरही मुख्यमंत्री राहू देत, हा नवस सगळ्यांत महत्त्वाचा!!

    कारण पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना कायम ठेवणे किंवा देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी कायम ठेवणे किंवा अन्यथा हलविणे हे बांगरांच्या हातात नाही. तसेही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणे हे देखील बांगरांच्या हातात नाही, पण आपल्याच गटाचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे राहावेत, असा त्यांचा नवस आहे.

    पंतप्रधानपदी 2024 नंतर नरेंद्र मोदी राहतील. कारण त्यांना पूर्ण बहुमताचे सरकार आणायचे आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भवितव्य मोदी – शाह यांच्या हातात आहे, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या समर्थकांनी मात्र त्यांचे भवितव्य सरळ सरळ गणपती बाप्पाच्या हाती सोपविले आहे आणि म्हणूनच वर उल्लेख केलेला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा अभंग आठवला. “नवसे कन्या पुत्र होती, तर काय करणे लागे पती??” जर नवसानेच मुलं होत असती, तर पती कशाला करायचा??, असे तुकोबांनी 400 वर्षांपूर्वी विचारले.

    त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्री पदाविषयी विचारावेसे वाटते. “नवसे कोणी मुख्यमंत्री होती, तर निवडणुकीत बहुमताच्या का लागावे नादी??” जर नवस सायास करून कोणी मुख्यमंत्री होत असेल, तर निवडणुका घ्यायच्याच कशाला?? पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी आटापिटा करायचाच कशाला??, हा प्रश्न विचारला पाहिजे.

    बरं नवस बोलणारे शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे नेते स्वतःच्या बहुमतासाठी प्रयत्न करत नाहीत. प्रयत्न केले तरी ते फळत नाहीत. तसेही राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला स्वबळावर कधीच जनतेचा पूर्ण बहुमताचा कौल मिळवून महाराष्ट्रात सत्तेवर येता आलेले नाही. त्यामुळेच त्यांचे नेते भाषा पुरोगामी महाराष्ट्राची करतात. फुले शाहू आंबेडकर नावाचा जप करतात, पण आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि त्यांचे पद टिकवण्यासाठी देवादिकांना नवस बोलत राहतात!!… त्यावेळी त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आठवत नाही!!

    after failure of getting full majority shivsena and NCP leaders make a vow to make eknath shinde and ajit pawar chief minister of maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस