प्रतिनिधी
पुणे : विठू नामाचा गजर करीत लाखो वारकरी आषाढी वारीला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी जात असतात. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका पिढ्यान्-पिढ्या सुरू असलेल्या वारीला सुद्धा बसला होता. वारीवर या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. पण आता सर्व वारक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याची घोषणा आता करण्यात आली आहे. After 2 years, this year’s Pandharpur Wari is restricted
सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व वारक-यांना यंदा आपल्या सर्व परंपरा पाळत पायी दिंडी करत आपल्या पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत आता कमी झाली आहे. महाराष्ट्रातले निर्बंध उठले आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. दरवर्षी 12 लाख वारकरी हे पायी वारी करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. पण यावर्षी किमान 15 लाख वारकरी पायी जाण्याची शक्यता असल्याचे भरणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रासाठी आनंद सोहळा
राज्याच्या कानाकोप-यातून येणा-या सर्व वारक-यांचे जिल्ह्यातील सर्वांनी स्वागत करायला हवे. हा केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रसाठी आनंद सोहळा आहे. तो परंपरेनुसार झाला पाहिजे असेही भरणे म्हणाले.
After 2 years, this year’s Pandharpur Wari is restricted
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिक : जामीन नाहीच, पण खासगी रुग्णालयात उपचाराची मूभा!!; पोलीस बंदोबस्ताचा खर्च मालिकांच्या खिशातून!!
- नोकरीची संधी : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागात 10000 पदांची भरती
- Akbaruddin Owaisi : औरंगजेबाच्या थडग्यात समोर वाकला; पण महाराष्ट्रातील नेत्यांच्या तोंडी वाफा!!; गुन्हा दाखल नाहीच!!
- NIA Action : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून टेरर फंडिंग; डी कंपनीच्या दोघांना अटक!!