• Download App
    सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षाची मागणी नाकारल्यानंतर व्हिडिओग्राफी सर्वेक्षण सुरू!!; प्रचंड बंदोबस्तVideography survey begins after Supreme Court rejects Muslim party's demand

    ज्ञानवापी मशीद : सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षाची मागणी नाकारल्यानंतर व्हिडिओग्राफी सर्वेक्षण सुरू!!; प्रचंड बंदोबस्त

    वृत्तसंस्था

    काशी : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचे आज सकाळी सकाळपासून व्हिडीओग्राफी सर्वेक्षण सुरू झाले आहे. सुप्रीम कोर्टाने व्हिडिओ मग्राफी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर वाराणसी कोर्टाचा आदेश जसाच्या तसा लागू झाला आहे. Videography survey begins after Supreme Court rejects Muslim party’s demand

    त्यामुळे येत्या 17 मे पर्यंत ज्ञानवापी मशीद आणि तळघर या दोन्हींचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल कोर्टाने नेमलेल्या तीन कोर्ट कमिशनरना सादर करायचा आहे. कोर्ट कमिशनर अजय कुमार मिश्रा, विशाल कुमार सिंह आणि अजय कुमार हे तीनही कोर्ट कमिशनर ज्ञानवापी मशीद परिसरात उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली ज्ञानवापी परिषद मशिदीचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.



    ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्वनाथ धाम परिसरामध्ये उत्तर प्रदेश पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून व्हिडिओ ग्राफी सर्वेक्षणात कोणत्याही प्रकारचा अडथळा उत्पन्न होऊ नये याची दखल आणि काळजी घेण्यात येत आहे. मुस्लिम पक्षाने स्थानिक वाराणसी कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन व्हिडिओग्राफी सर्वेक्षण थांबविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दोन्ही गाणी कोर्टाने संबंधित सर्वेक्षण थांबवता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण होत आहे.

    बाबरी मशीद आम्ही गमावली. परंतु, आणखी एक मशीद आम्ही गमावू इच्छित नाही, अशी भूमिका हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मांडली आहे. पण त्या पलिकडे जाऊन त्यांनी एक भडकावू वक्तव्य केले आहे. उद्या जर मी पंतप्रधानांच्या निवासस्थानी खाली मशिद आहे, असे म्हटले तर मला तिथे खोदकाम करण्याची परवानगी कोर्ट देणार आहे का?, असा जहरी सवाल ओवैसी यांनी करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

    Videography survey begins after Supreme Court rejects Muslim party’s demand

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले