• Download App
    Virendra Sehwagh : विरेंद्र सेहवागचे स्वागत शिव्यांनी:शाहिद अफ्रिदी-शोएब अख्तर- मोहम्मद युसूफ आणि पाकिस्तानी संघ;अन् विरूचे मुल्तानामधील तिहेरी शतक... । Afridi, Shoaib Akhtar, Mohammad Yousuf welcomed me by abusing a lot': Sehwag recalls India debut against Pakistan

    Virendra Sehwagh : विरेंद्र सेहवागचे स्वागत शिव्यांनी:शाहिद अफ्रिदी-शोएब अख्तर- मोहम्मद युसूफ आणि पाकिस्तानी संघ;अन् विरूचे मुल्तानामधील तिहेरी शतक…

    जेव्हा कधी भारताच्या महान फलंदाजांविषयी चर्चा होते, तेव्हा विरेंद्र सेहवागचे नाव घेतलेच जाते.


    मी जेव्हा कधी पाकिस्तानविरुद्ध खेळलो, तेव्हा माझे रक्त गरम व्हायचे …


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : क्रिकेट म्हण्टल की प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की, त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण अप्रतिम व्हावे आणि ते चाहत्यांच्या कायम स्मरणात रहावे.सेहवागसोबत त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात असेच काहीसे झाले होते.पाकिस्तानी क्रिकेट संघाने सेहवागचे स्वागत शिव्यांनी केले होते आणि विरूने प्रत्येक सामन्यात पाकिस्तानला धू-धू धूतले होते. Afridi, Shoaib Akhtar, Mohammad Yousuf welcomed me by abusing a lot’: Sehwag recalls India debut against Pakistan

    सेहवाग या सामन्यात काही कमाल करू शकाल नव्हता. त्याने १९९९ मध्ये त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण केले होते. तो या सामन्यात केवळ एक धाव करू शकला होता.



    सेहवाग त्यावेळी संघाच्या मध्यक्रमात फलंदाजी करायचा. तो त्याच्या पहिला अंतराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. तो सामन्यादरम्यान फलंदाजीसाठी मैदानात येताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली होती. सेहवागने आरजे रोनकच्या कार्यक्रमामध्ये बोलताना या घडनेची माहिती दिली आहे.

    तो म्हणाला, “मी त्यावेळी २०-२१ वर्षाचा होतो. मी फलंदाजी करायला गेलो तर शाहिद अफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद युसूफ आणि पाकिस्तानच्या संघाचे बाकीच्या सदस्यांनी माझे शिव्यांनी स्वागत केले, त्याही अशा ज्या मी कधी ऐकल्याही नव्हत्या.”

    भारतीय संघ या सामन्यात सात विकेट्सने पराभूत झाला होता. भारतीय संघ १९६ धावांवर सर्वाबाद झाला होता आणि पाकिस्तानने ४२ षटकांमध्ये तीन विकेट्स गमावत सामना जिंकला होता.

    सेहवागने सांगितले की हा त्याचा पहिला सामना होता त्यामुळे तो जास्त काही करू शकला नाही. तो पुढे बोलताना म्हणाला, “मी थोडीफार पंजाबी समजू शकतो, त्यामुळे मला समजत होते की ते काय बोलत आहेत, पण मी काही करू शकत नव्हतो. कारण तो माझा पहिला सामना होता आणि मी अस्वस्थ होतो. अंदाजे २५००० लोक सामना पाहण्यासाठी आले होते. मी कधीच विचार केला नव्हता की मी कधी एवढ्या लोकांसमोर खेळेल. त्यामुळे तेव्हा मी कही करू शकलो नाही. मात्र, नंतर मी जेव्हा एक चांगला खेळाडू बनलो, तेव्हा मी हे पक्के केले की त्यांना हे सगळं परत करणार”

    “आम्ही जेव्हा २००४ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा मी मुल्तानामध्ये तिहेरी शतक केले. मी त्यांच्या सगळ्या शिव्या परत केल्या आणि बदला घेतला. मी जेव्हा कधी पाकिस्तानविरुद्ध खेळलो, तेव्हा माझे रक्त गरम व्हायचे आणि मी त्यांच्या विरुद्ध नेहमीच चांगले प्रदर्शन केले आहे.

    Afridi, Shoaib Akhtar, Mohammad Yousuf welcomed me by abusing a lot’: Sehwag recalls India debut against Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस