विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतरही बीसीसीआय पैशासाठी हा सामना खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीसीसीआयची ही भूमिका देशाच्या आणि सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करणारी असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे ‘राष्ट्रविरोधी’ आणि ‘अमानुष’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.Aditya Thackeray
सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले, “बीसीसीआयची ही निर्लज्ज वागणूक पाहून मी हैराण झालो आहे. ही वागणूक केवळ राष्ट्रविरोधी नाही, तर अमानवी आहे.” ज्या देशातील दहशतवाद्यांनी पहेलगाममध्ये आपल्या नागरिकांची निर्घृण हत्या केली, त्याच देशासोबत पैशासाठी क्रिकेट खेळणे हे अत्यंत निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशी टीका त्यांनी केली.Aditya Thackeray
बीसीसीआय पैशासाठी खेळ खेळतेय
आदित्य ठाकरे म्हणाले, “पाकिस्तानने भारतात आयोजित हॉकी आशिया चषकावर बहिष्कार टाकला. पण बीसीसीआय मात्र केवळ पैशासाठी हा सामना खेळत आहे. यापेक्षा वाईट काय असू शकते? दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशासोबत खेळण्यापेक्षा दुसरे मोठे राष्ट्रविरोधी कृत्य नाही.”
सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
याचबरोबर, त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले. “केंद्र सरकारचे यावरचे मौन धक्कादायक आहे,” असे ते म्हणाले. जगभर शिष्टमंडळे पाठवून पहेलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगायचे आणि नंतर आपल्या शूर सैनिकांच्या कारवाईचा राजकीय फायदा निवडणुकीच्या प्रचारात घ्यायचा, हे किती योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला.
हे ‘सिंदूर’चे मोल आहे का?
आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला थेट आव्हान दिले. “पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवत नाही, तोपर्यंत बीसीसीआयला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू नका, असा आदेश सरकार देऊ शकत नाही का?” अशी विचारणा करत “हे ‘सिंदूर’चे मोल आहे का?” असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारल आहे.
भारत-पाक सामन्यावर संमिश्र प्रतिक्रिया
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रीय भावना आणि क्रीडा यांच्यातील संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामने
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे दोन महत्त्वाचे सामने होणार आहेत. पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार असून, दुसरा सामना 21 सप्टेंबरला त्याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 सप्टेंबरला होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे.
Aditya Thackeray Slams BCCI Playing Pakistan
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींचे ‘व्होट चोरी’ कागदपत्र तर परदेशात तयार! म्यानमार कनेक्शन उघड, काँग्रेस बचावाच्या भूमिकेत
- Election Commission : निवडणूक आयोगाची राज्य अधिकाऱ्यांसोबत बैठक; मतदार पडताळणीवर चर्चा; बिहारमध्ये आधार कार्डला 12वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरण्याचे निर्देश
- Vote chori चोरीच्या आरोपांचे म्यानमार मध्ये डिजिटल धागेदोरे; राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवर संशयाचे वारे!!
- याला म्हणतात, अमेरिकन भांडवलशाहीचा अतिउच्च बुद्धिवाद; भारतातल्या भांडवलशाही विरुद्ध fake narrative चे सोडले बाण!!