विशेष प्रतिनिधी
मुंबई : चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईने कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांनी आयोसिस स्लिमिंग स्किन सलून अँड स्पा नावाची कंपनी सुरू केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राजधानीत आपली शाखा उघडण्याच्या नावाखाली अनेक लोकांशी संपर्क साधला. याची शाखा चालवायला देण्याच्या नावाखाली त्यांनी कोट्यवधी रुपये वसूल केल्याचे आरोप आहेत.Actress Shilpa Shetty and her mother accused of cheating crores of rupees, Lucknow police reached Mumbai
या प्रकरणी विभूतीखंड पोलीस ठाण्यातील ओमक्से हाइट्सच्या रहिवासी ज्योत्स्ना चौहान आणि हजरतगंज पोलीस ठाण्यात रोहित वीर सिंह यांनी शेट्टीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांची दखल घेऊन तपास तीव्र केला आहे.
या प्रकरणात शिल्पा आणि तिची आई सुनंदा यांचीही भूमिका आता समोर येत आहे. यासंदर्भात हजरतगंज पोलिसांनी एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवली होती. त्याचबरोबर विभूतीखंड पोलिसांचे पथकही नोटीस देण्यासाठी पोहोचत आहे. दुसरीकडे, डीसीपी ईस्टची विशेष टीम वेगळ्या तपासासाठी मुंबईत पोहोचली आहे. तपासात भूमिका स्पष्ट असल्यास दोघींनाही अटक होऊ शकते.
विभूतीखंड पोलीस स्टेशन परिसरातील ओमाक्से हाइट्समध्ये राहणाऱ्या ज्योत्स्ना चौहान यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये गुन्हा दाखल केला होता. ज्यात त्यांच्याकडून वेलनेस सेंटर उघडण्याच्या नावाखाली आयोसिस कंपनीचे किरण वावा, विनय भसीन, अनिका चतुर्वेदी, इशराफिल, नवनीत कौर, आशा, पूनम झा यांनी दोन वेळा सुमारे अडीच कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे.
त्याचवेळी कंपनीच्या लोकांनी शाखा उघडण्यासाठी माल पाठवला. त्या बदल्यात पैसे वसूल करण्यात आले. यासाठी अनेक बनावट कागदपत्रे वापरली गेली. शाखेच्या उद्घाटनाला सेलिब्रिटी येण्याचे आश्वासन होते. पण उद्घाटनाच्या थोड्या वेळापूर्वीच त्यांनी या आश्वासनापासून पाठ फिरवली.
पीडितांच्या मते, कंपनीने त्यांचे खूप नुकसान केले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी रोहित वीर सिंगने हजरतगंज पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल केला. यात पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांना एक महिन्यापूर्वी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावली होती. पण दोघांनीही त्यांचे जबाब नोंदवले नाहीत. लवकरच हजरतगंज पोलीसदेखील मुंबईला जाऊन दोन्ही सेलिब्रिटींचे जबाब पुन्हा नोंदवू शकतात.
एसीपी अनुप सिंग म्हणाले की, ज्योत्स्ना चौहानच्या प्रकरणाचा तपास वेब चौकी करत होते. यादरम्यान, पीडित पक्षाने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर खटल्यात बनावट कागदपत्रे तयार करण्याचे कलम वाढवण्यात आले. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास विभूतीखंड पोलीस ठाण्यातून चिन्हाट येथे हस्तांतरित झाला. आता त्यांची चौकशी सुरू आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास डीसीपी संजीव सुमन स्वतः करत आहेत.
या प्रकरणाबाबत पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे एक पथक मुंबईला पाठवले आहे. त्याचवेळी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांचे जबाब नोंदवण्यासाठी आणि इतर मुद्द्यांवर चौकशी करण्यासाठी तपास अधिकारी सोमवारी मुंबईला रवाना होतील. एसीपींच्या मते, हे प्रकरण अत्यंत हायप्रोफाईल आणि संवेदनशील आहे. यामुळे बारीक सारीक सर्व प्रत्येक पैलूंची चौकशी केली जात आहे. पुरावे गोळा केल्यानंतर आरोपींना अटकही होण्याची शक्यता आहे.
Actress Shilpa Shetty and her mother accused of cheating crores of rupees, Lucknow police reached Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- चीनसारख्या उभरत्या सुपर पॉवरला रोखण्याची भारताकडे मोठी क्षमता; ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबोट यांचे प्रतिपादन
- पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा आठवडा : 127 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विरोधकांच्या गदारोळामुळे सभागृह तहकूब
- सरपंच निवडणुकीतील वादातून सराईत गुन्हेगारावर भर रस्त्यात गोळीबार
- आपल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्याचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी मागितली लाच, जलसंपदाच्या उपअभियंत्याविरुद्ध गुन्हा
- जिल्हाधिकारी नियुक्ती वाद; राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू; परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधवांचे वक्तव्य