प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबईत आले होते. यादरम्यान त्यांच्या सुरक्षेतील कुचराईचे प्रकरण समोर आले आहे. अमित शाह यांच्याभोवती एक व्यक्ती बराच वेळ फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर ती व्यक्ती स्वत:ला आंध्र प्रदेशच्या खासदाराचा पीए असल्याचे सांगून अनेक तास फिरत राहिली.A major lapse in security during Amit Shah’s visit to Mumbai Andhra Pradesh MP spotted walking around as PA, arrested
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या सुरक्षेत गलथानपणा झाल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या असून मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचं भासवून हेमंत पवार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आसपास फिरत होता. मात्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता केंद्रीय गृह मंत्रालयाचा अधिकारी असल्याची खोटी माहिती त्याने दिली होती, परंतु तो सरकारी अधिकारी नसल्याचं तपासात उघड झालं आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तो धुळ्याचा रहिवासी असल्याचं समजलं. हेमंत कुठल्या कारणासाठी अमित शाह यांच्याजवळ घुटमळत होता, त्याने धुळ्याहून मुंबई कुठल्या कारणास्तव गाठलं, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
A major lapse in security during Amit Shah’s visit to Mumbai Andhra Pradesh MP spotted walking around as PA, arrested
महत्वाच्या बातम्या
- आधी एकत्र येऊ, मग नेता निवडू : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट
- पीएम- श्री अंतर्गत देशभरातील 14,597 शाळा होणार अद्ययावत : पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेस मंजुरी
- नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळ विस्तार : स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी सागितली वेळ
- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या कबरीचे उद्दात्तीकरण!!; महाराष्ट्रभर संताप!!