वृत्तसंस्था
पुणे : राज्य सरकारकडून लस उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारी पुन्यातील लसीकरण केंद्र सुरू झाली़. मात्र, १७२ पैकी अनेक केंद्रांवर दुपारी बारा एक वाजताच लस संपली. त्यामुळे ती बंद करावी लागली. 30 केंद्रे लस नसल्यामुळे बंद करावी लागली. 30 centers closed in Pune due to depletion of anti-corona vaccine; Avoid at one o’clock in the afternoon
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार केवळ १९० डोस शिल्लक आहेत़. शुक्रवारी दीड हजार डोस वितरित केले आहेत़. परंतु, काही खासगी रूग्णालयांनी तथा महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर मिळून साधारणत: दहा हजार डोस यापूर्वी घेतलेले आहेत़. त्यामुळे शनिवारी काही लसीकरण केंद्रांवर शंभर पेक्षा अधिक जणांना लस मिळण्याची शक्यता आहे़. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत राज्य सरकारकडून महापालिकेकडे आणखी लस प्राप्त झाल्या नाहीत, असे वृत्त होते.