• Download App
    सचिन वाझे केस :कहाणी वाझेंची क्राईम सीन रिक्रिएट @12 ; एनआयए टीमचा लोकल ट्रेनने प्रवास।Sachin Waze and NIA officers travelled by Mumbai Local train @12

    सचिन वाझे केस :कहाणी वाझेंची क्राईम सीन रिक्रिएट @12 ; एनआयए टीमचा लोकल ट्रेनने प्रवास

    रात्री 12.15 च्या लोकल ट्रेनने एनआयए ची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली Sachin Waze and NIA officers travelled by Mumbai Local train @12


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. यांना घेऊन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील लोकल ट्रेनने प्रवास केला. 4 मार्च रोजीच्या घटनांचे नाट्यरुपांतरण करण्यासाठी सचिन वाझे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि कळवा रेल्वे स्थानकात नेण्यात आले होते. Sachin Waze and NIA officers travelled by Mumbai Local train @12

    रात्री साधारण सव्वाअकराच्या सुमारास एनआयए चे अधिकारी वाझे यांना घेऊन मुंबईतील कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर साडेअकरा वाजता हे सर्वजण सीएसएमटी स्थानकात दाखल झाले. याठिकाणी फलाट क्रमांक 4 आणि 5 वर सचिन वाझे यांना नेऊन 4 मार्चच्या रात्री काय घडले होते, याची नेमकी माहिती ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.



    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी सीएसएमटी ते कळवा हा प्रवास लोकल ट्रेनने केला होता. त्यामुळे रात्री 12.15 च्या लोकल ट्रेनने एनआयएची टीम सचिन वाझे यांना घेऊन कळव्याच्या दिशेने निघाली. साधारण 12.45 च्या सुमारास लोकल ट्रेन कळव्याला पोहोचली. याठिकाणी उतरल्यानंतर एनआयए च्या अधिकाऱ्यांनी 30 मिनिटं थांबून 4 मार्चच्या रात्री घडलेल्या घटनांचे नाट्यरुपांतरण (क्राईम सीन रिक्रिएट) केले. हे सगळं आटोपल्यानंतर NIAची टीम रात्री सव्वाच्या सुमारास सचिन वाझे यांना घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रात्री दोन वाजता हे सर्वजण पुन्हा मुंबई एनआयए कार्यालयात पोहोचले.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनआयए च्या हाती आणखी एक सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. त्यामध्ये साचिन वाझे यांनी 4 मार्च रोजी सीएसटी ते कळवा प्रवास केला होता. यापूर्वी सचिन वाझे यांना घेऊन एनआयएने अँटलिया आणि अन्य परिसरात क्राईम सीन रिक्रिएट केले आहेत.

    या माध्यमातून एनआयए अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

    Sachin Waze and NIA officers travelled by Mumbai Local train @12

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!