विशेष प्रतिनिधी
कल्याण : कोळसेवाडी परिसरात पाणीपुरवठा बंद झाला आहे. कारण कल्याण पूर्व शहराला पाणीपुरवठा करणारी ६ मिमी व्यास असलेली वाहिनी आज सकाळी अचानक फुटल्याने १० मीटर उंच पाण्याचे फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले.Millions Liters of water wasted in kalyan due to leakedge in pipe
पालिकेचा कोणीही अधिकारी या ठिकाणी न फिरकल्याने तब्बल अर्धा तास हे पाणी वाया जात होते. अर्ध्या तासानंतर अधिकाऱ्यांनी ही वाहिनी बंद केली. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही वाहिनी फुटली असल्याचे सांगत आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोळसेवाडी परिसर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
- कल्याणमध्ये लाखोलिटर पाणी वाया
- महापालिकेची जलवाहिनी फुटली
- रस्त्याचे काम सुरु असताना वाहिनीला तडा
- १० मीटर उंचीचे पाण्याचे फवारे उडाले
- अर्धा तास सुरु होती पाण्याची गळती
- अधिकारी, कर्मचाऱ्यांची घटनास्थळी धाव
- अखेर गळती रोखल्याने पाण्याचा अपव्यवय थांबला