Wednesday, 30 April 2025
  • Download App
    या सीईओंनी फेसबुकचा वापर कमी व्हावा यासाठी थप्पड मारण्यासाठी हायर केली एम्प्लॉई! ह्या अनोख्या आयडीयावर काय म्हणताहेत इलोन मस्क? | This CEOs hired employee to slap to reduce the use of facebook! What does Elon Musk have to say about this unique idea?

    या सीईओंनी फेसबुकचा वापर कमी व्हावा यासाठी थप्पड मारण्यासाठी हायर केली एम्प्लॉई! ह्या अनोख्या आयडीयावर काय म्हणताहेत इलोन मस्क?

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे आता नवीन व्यसनाचा भाग बनले आहे. दिवसातला आपण जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर फक्त वॉलवर स्क्रोल करण्यातच घालवतो. कितीही ठरवलं तरी आपण फेसबुक आणि इन्स्टाग्राम अधूनमधून ओपन करतच असतो. यामुळे आपले लक्ष विचलित होते, फोकस लॉस्ट होतो. बऱ्याच वेळा आपण ठरवतो की, काही दिवस आपण फेसबुकवर जाणार नाही. मग आपण अकाउंट डीअॅक्टिव्हेट करतो. फेसबुक अॅप मोबाईलमधून डिलीट करतो. पण दोन दिवस नाही झाले नसतील तर आपण पुन्हा मागचे पन्नास पाढे गिरवतोच.

    This CEOs hired employee to slap to reduce the use of facebook! What does Elon Musk have to say about this unique idea?

    2012 मध्ये भारतीय अमेरिकन वंशाचा मनीष सेठी ह्या व्यक्तीने आपल्या कंपनीमध्ये एका एम्प्लॉयी हायर केला होता. या एम्प्लॉईचे फक्त एकच काम होते. जर त्याने त्याच्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर फेसबुक किंवा इन्स्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट ओपन केले, तर तिने त्याला थप्पड मारायचे.


    ट्विटरवर घेतलेल्या त्या पोलसाठी, इलॉन मस्क यांनी पाळला आपला शब्द!


    ऐकायला काही वेगळं वाटतं ना? पण हे खरं आहे. मनीष हा पावलोक या कॉम्पुटर कंपनीचा सीईओ आहे. आपली प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी त्याने तासाला आठ डॉलर इतका पगार देत थोबाडीत मारण्यासाठी एक एम्प्लॉई हवा आहे अशी जाहिरात देखील दिली होती. कारा नावाच्या मुलीने ही नोकरी मिळवली. आणि त्यानंतर त्याची प्रोडक्टिव्हिटी 98 टक्क्यांनी वाढली.

    सायन्स टेक्नॉलॉजी ऑफ मॅथेमॅटिक्सच्या ट्विटर पेजवर ही माहिती देण्यात आली होती. ह्या जुन्या पोस्टवर इलॉन मस्क यांनी नुकताच आपली रिअॅक्शन दिली आहे. दोन फायर इमोजी त्यांनी पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे ही पोस्ट पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

    This CEOs hired employee to slap to reduce the use of facebook! What does Elon Musk have to say about this unique idea?

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Abbas Port : इराणच्या अब्बास पोर्टवर स्फोट, 5 जणांचा मृत्यू; 700 हून अधिक जखमी

    PAK Army Chief : PAK लष्करप्रमुखाकडून पुन्हा एकदा द्विराष्ट्र सिद्धांताचा उल्लेख- मुस्लिमांची विचारसरणी हिंदूंपेक्षा वेगळी!

    Trump : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- पुतीन मला मूर्ख बनवत आहेत; कदाचित त्यांना युद्ध थांबवायचे नाही