• Download App
    शालेय शिक्षण विभागाने तयार केले ' महा स्टुडन्ट ॲप ' ; विद्यार्थ्यांची अचूक उपस्थितीची माहिती मिळणार'Maha Student App' created by the Department of School Education; Students will get accurate attendance information

    शालेय शिक्षण विभागाने तयार केले ‘ महा स्टुडन्ट ॲप ‘ ; विद्यार्थ्यांची अचूक उपस्थितीची माहिती मिळणार

    सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.’Maha Student App’ created by the Department of School Education; Students will get accurate attendance information.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांची शाळेतील उपस्थिती अचूकरित्या समजावी आणि विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाने महा स्टुडन्ट ॲप (maha student app) तयार केले आहे.आठवडाभरात राज्यातील सर्व शाळांमध्ये हे ॲप लागू करण्यात येणार आहे.

    सदर ॲप हे गुगल प्ले स्टोअर वर MahaStudent या नावाने उपलब्ध आहे. या ॲप मध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती डिजीटल पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.Maha student aap मुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे हजेरीपत्रक वेगळे ठेवण्याची गरज नाही.विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठीची सुविधा Maha student aap वर देण्यात आलेली आहे.या ॲपवरून सर्व विद्यार्थ्यांचे आकारिक व संकलितचे गुण भरता येणार आहेत.



    आतापर्यंत शाळांमध्ये विद्यार्थी अथवा शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जात आहे. यापुढे अचूक आणि योग्य माहिती मिळावी यासाठी महा स्टुडन्ट ॲपद्वारे उपस्थिती नोंदवली जाणार आहे. ही माहिती सतत अद्ययावत केली जाणार आहे.तसेच शालेय पोषण आहार सर्व विद्यार्थ्यांना मिळाला अथवा नाही याबाबत माहिती मिळणार आहे.

    तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की आता या ॲपद्वारे एका शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या शाळेत नोंद होणार नाही. त्यामुळे बोगस पट नोंदणीला आळा बसणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवरही यामुळे चाप बसेल.

    ‘Maha Student App’ created by the Department of School Education; Students will get accurate attendance information

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांच्या माढा मोहिमेनंतर फडणवीसांची स्वारी; फेरमांडणी करून “मोदी है तो मुमकिन है” ची कसून पूर्वतयारी!!

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता