• Download App
    तालीबानने बंद केली भारतासोबतची आयात-निर्यात, सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती|The Taliban cut off imports and exports with India, fearing a rise in dried fruit prices

    तालीबानने बंद केली भारतासोबतची आयात-निर्यात, सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होण्याची भीती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: तालिबाने अफगणिस्थान ताब्यात घेतल्यावर भारताबरोबरची सर्व आयात आणि निर्यात बंद केली असल्याची माहिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक डॉ.अजय सहाय यांनी दिली. सध्या तालिबानने पाकिस्तानच्या संक्रमण मार्गांद्वारे होणारी मालवाहतूक बंद केली आहे. यामुळे सुकामेव्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. भारत अफगाणिस्तानमधून सुमारे ८५ टक्के सुका मेवा आयात करत आहे.The Taliban cut off imports and exports with India, fearing a rise in dried fruit prices

    डॉ. सहाय म्हणाले, आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक नजर ठेऊन आहोत. तालिबानने पाकिस्तानला होणारी कार्गो वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पाकिस्तानहून येणारा माल थांबला आहे. भारताचे अफगाणिस्तानशी दीर्घकालीन संबंध आहेत. अफगाणिस्तानबरोबरच्या व्यापारातील भारत सर्वात मोठा भागीदार आहे.



    २०२१ साठी भारतातून अफगाणिस्तानला ८३५ दशलक्ष डॉलर्सची निर्यात झाली होती. त्याचवेळी अफगणिस्थानातून भारतात ५१० दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या. या व्यापाराव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सची ही गुंतवणूक आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या भारताच्या सहकार्याने ४०० प्रकल्प सुरू आहेत.

    सहाय म्हणाले, भारताचे अफगाणिस्तानशी सुदृढ व्यापारी संबंध आहेत. भारतातून अफगणिस्थानला साखर, फार्मास्युटिकल्स, कपडे, चहा, कॉफी, मसाले आणि ट्रान्समिशन टॉवर यांची निर्यात होते. प्रामुख्याने सुकामेवा आणि थोड्याफार प्रमाणात डिंक आणि कांदे आयात केले जातात. भारतीय अधिकारी अफगणिस्थानशी संपर्क ठेऊन असून लवकरच व्यापारी संबंध पूर्ववत होतील.

    आर्थिक विकास हाच प्रगतीचा मार्ग आहे हे अफगणिस्थानला लवकरच समजेल असा विश्वास व्यक्त करून सहाय म्हणाले, अफगणिस्थानातील नव्या राजवटीला भारताकडून राजकीय मान्यता मिळेल का हे देखील महत्वाचे ठरणार आहे. सुकामेव्याच्या किंमतीवर याचा परिणाम होणार आहे. भारतात होणाऱ्या सुकामेव्याच्या आयातीपैकी मोठा हिस्सा अफगणिस्थानातून येतो.

    The Taliban cut off imports and exports with India, fearing a rise in dried fruit prices

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार

    Bangladeshi : बांगलादेशी कट्टरवाद्यांनी आणखी एका हिंदू नेत्याची केली हत्या