• Download App
    मोदींच्या नेतृत्वाखालील भारत पाकविरोधात लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक, अमेरिकेतील अहवालाने खळबळ |India might attack on pakistan

    मोदींच्या नेतृत्वाखालील भारत पाकविरोधात लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक, अमेरिकेतील अहवालाने खळबळ

    विशेष प्रतिनिधी 

    वॉशिंग्टन : पाकिस्तानकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या चिथावणीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे या दोन अण्वस्त्रक्षम शेजाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे,India might attack on pakistan

    असा दावा करणारा अहवाल येथील गुप्तचर विभागाने अमेरिकी काँग्रेससमोर मांडला आहे.भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये ३७० वे कलम रद्द करून जम्मू आणि काश्मीिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यापासून दोन्ही देशांमध्ये एकमेकांचे उच्चायुक्त नाहीत.



    पाकिस्तानने दहशतवादाला पाठबळ देणे थांबविले तरच त्यांच्याशी चर्चा करू, अशी भारताची भूमिका आहे.नॅशनल इंटेलिजन्स या संस्थेच्या या अहवालानुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची क्षमता नसली तरी त्यांच्यातील तणाव वाढण्याचा अंदाज आहे.

    काश्मीहरमध्ये हिंसाचार वाढल्यास किंवा भारतात इतरत्र दहशतवादी हल्ला झाल्यास या संघर्षाची ठिणगी पडेल,’’ असे या अहवालात म्हटले आहे.

    India might attack on pakistan

    Related posts

    Canada : कॅनडात मंदिराच्या भिंतीवर लिहिल्या खलिस्तानी घोषणा; नगर कीर्तनापूर्वी कारवाई

    America : अमेरिकेत हजारो लोकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला घेराव घातला; सर्व ५० राज्यांमध्ये निदर्शने

    Pakistan-China border : पाकिस्तान अन् चीन सीमेवरील घुसखोरी, तस्करी रोखली जाणार